देहली नगरपालिका कोरोनामुक्त झालेल्यांवर आयुर्वेद आणि पंचकर्म यांद्वारे पुढील उपचार करणार

आता आयुर्वेदाचे महत्त्व लक्षात येऊ लागल्याने सरकारी स्तरावर जर असे उपचार होत असतील, तर ते स्वागतार्ह आहेत ! असे प्रयत्न देशात सर्वच ठिकाणी झाले पाहिजेत !

नवी देहली – देहली नगरपालिका कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांवर आयुर्वेद आणि पंचकर्म यांच्या साहाय्याने उपचार करण्यासाठी रुग्णालयांमध्ये विशेष विभाग बनवणार आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर व्यक्तीला थकवा येत असतो. तसेच त्यांना अन्य आजार असतील, तर त्याचाही परिणाम होत असतो. त्यांची रोगप्रतिकार शक्ती न्यून झालेली असते. अशांवर येथे उपचार करण्यात येणार आहेत.

उत्तर नगरपालिकेचे महापौर जयप्रकाश यांनी सांगितले की, प्रशांत विहार, पदम नगर, राजेंद्र नगर, हैदरपूर, बेगमपूर आणि करमपुरा येथील पंचकर्म रुग्णालयांना ‘पोस्ट कोविड केयर’ रुग्णालय बनवण्यात येणार आहे. किमान १ सहस्र रुग्णांवर येथे उपचार करण्याची सोय करण्यात येणार आहे.