संकेतस्थळावर नरसंहाराची माहिती देणारे ‘वेब पेज’ पाककडून ब्लॉक !
|
नवी देहली – ‘हिंदू अमेरिकन फाऊंडेशन’ या अमेरिकेतील संघटनेने म्हटले आहे की, पाकिस्तानच्या दूरसंचार प्राधिकरणाच्या ‘वेब अॅनालिसिस डिव्हीजन’कडून एक पत्र मिळाले आहे. त्या पत्रात ‘बंगाली हिंदू जेनोसाइड’ नावाचे या संघटनेचे ‘वेब पेज’ २४ घंट्यांत हटवण्याचा आदेश दिला आहे. या वेब पेजवर वर्ष १९७१ मध्ये तत्कालीन पूर्व पाकिस्तान (आताचे बांगलादेश) येथे पाकच्या सैन्याने केलेल्या नरसंहाराची माहिती देण्यात आली आहे. या पत्रात पुढे म्हटले आहे, ‘जर हे ‘वेब पेज’ हटवण्यात आले नाही, तर पाक सरकार याला हटवेल किंवा ‘ब्लॉक’ करील.’ सध्या हे ‘वेब पेज’ पाकमध्ये ‘ब्लॉक’ करण्यात आले आहे.
ICYMI: This is the website, commemorating the 1971 Bengal Hindu genocide, that so offended the Govt. of Pakistan that they blocked the@HinduAmerican website and threatened to fine HAF.https://t.co/N1gkUUO3bD
— Hindu American Foundation (@HinduAmerican) May 27, 2021
१. वर्ष १९७१ मध्ये झालेला नरसंहार अनुमाने १० मास चालू होता. यात २० ते ३० लाख लोक ठार झाले होते. २ ते ४ लाख महिलांवर बलात्कार करण्यात आले, तर १ कोटी लोक विस्थापित झाले. यात बहुतांश हिंदू होते.
२. हिंदू अमेरिकन फाऊंडेशनने ‘वेब पेज’ बंद करण्यास नकार दिला आहे. संघटनेच्या मानवाधिकार संचालक दीपाली कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, पाकिस्तान सरकारचा हा एका सन्मानित खासगी संस्थेला धमकावण्याचा अयशस्वी प्रयत्न त्याच्या अमेरिकी आणि हिंदुविरोधी कृत्यांचे एक ताजे उदाहरण आहे.