महसूल मंडलामध्ये होणार विलगीकरण कक्षांची स्थापना 

प्रातिनिधिक चित्र

सातारा, ३० मे (वार्ता.) – कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आणि गृह विलगीकरणामध्ये ठेवलेले रुग्ण बिनधास्तपणे घराबाहेर फिरत आहेत. त्यामुळे असे रुग्ण ‘सुपर स्प्रेडर’ ठरत आहेत. त्यांना पायबंद घालण्यासाठी पाटण तालुक्यात १४ महसुली मंडलांमध्ये विलगीकरण कक्षांची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांना १४ दिवस विलगीकरण कक्षात रहावे लागणार आहे. पाटण प्रशासनाने मंडलनिहाय विलगीकरण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी १४ पथके निर्माण करण्यात आली आहेत.