राज्यात कोरोनामुळे पालक गमावलेली १९५ बालके झाली अनाथ ! – यशोमती ठाकूर, महिला आणि बालकल्याणमंत्री

महिला आणि बालविकास खाते बालकांचे दायित्व घेणार !

महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर

नागपूर – ‘राज्यात कोरोनामुळे पालक गमावलेली अनुमाने १९५ बालके अनाथ झाली आहेत. यामध्ये आई-वडील गमावलेल्या मुलांची संख्या १०८, तर एकच पालक गमावलेली मुले ८७ आहेत. सर्वाधिक नंदुरबार येथे ९३ मुले अनाथ झाली आहेत. त्यातील ६६ मुलांनी आपले आई-वडील, तर २७ मुलांनी १ पालक गमावले आहे.

अनाथ मुलांचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी महिला आणि बालविकास विभागाच्या वतीने जिल्हास्तरावर ‘कृतीदल स्थापन’ करण्यात आले आहे. त्याअंतर्गत पालकांना गमावलेल्या १९५ पैकी ४२ जणांचे दायित्व राज्यशासनाने यापूर्वीच घेतले आहे, अशी माहिती राज्याच्या महिला आणि बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी २३ मे या दिवशी दिली.

अनाथ झालेली बालके शोषणास बळी पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी अन् जीवनमान सहज होण्यासाठी ‘टास्क फोर्स’च्या माध्यमातून राज्यशासनाने दायित्व घेतले आहे.