महाराष्ट्रात ७ वर्षांत २०० हून अधिक पोलिसांच्या आत्महत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

वर्ष २००९ ते वर्ष २०१६ पर्यंत ७ वर्षांमध्ये २०० पोलिसांनी आत्महत्या केल्या आहेत. यात अधिकार्‍यांची संख्या ३५ हून अधिक आहे. ६ मासांत म्हणजेच जानेवारी ते जून २०१६ अखेरपर्यंत दोघा अधिकार्‍यांसह ८ जणांनी सेवेत असतांना आयुष्य संपवले. आता ही आकडेवारी गेल्या ४ वर्षांत अधिक वाढली आहे.

बोरीवली-चर्चगेट लोकलगाडीत महिलांच्या डब्यात बंदोबस्ताला असलेले हवालदार शिवाजी गायकवाड यांनी मालाड आणि गोरेगाव स्थानकाच्या दरम्यान बंदुकीतून गोळी झाडत आत्महत्या केली. पोलिसांच्या आत्महत्यांच्या बहुतांश घटनांमागे कामाचा ताण, वरिष्ठ सहकार्‍यांकडून होणारी पिळवणूक आणि कौटुंबिक कलह ही कारणे असल्याचे तपासातून पुढे आल्याचे गृह विभागातील सूत्रांनी सांगितले.

(मनोबल खचलेले पोलीस असणारे खाते जनतेचे संरक्षण कसे करणार ? – संपादक)