भारतीय तटरक्षक दलाने निवती रॉक दीपगृहात अडकलेल्या २ कर्मचार्‍यांची केली सुटका

प्रतिकात्मक चित्र

वेंगुर्ला – भारतीय तटरक्षक दलाने तौक्ते चक्रीवादळात अत्यंत महत्त्वपूर्ण काम केले असून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने वास्कोच्या उत्तरेकडे ३८ समुद्री मैल अंतरावर असलेल्या वेंगुर्ले निवती रॉक दीपगृहात अडकलेल्या २ कर्मचार्‍यांना सुखरूप बाहेर काढले आहे. या कर्मचार्‍यांना किनार्‍यावर आणण्यात आले आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे समुद्र खवळल्याने या दीपगृहावरील विद्युत पुरवठा खंडित झाला, तसेच या दीपगृहाची मोठी हानीही झाली आहे.