सिंधुदुर्ग – जिल्ह्यात ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे झालेल्या हानीची पहाणी करण्यासाठी येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. हानीग्रस्त भागाची पहाणी केल्यानंतर याविषयी ते आढावा बैठक घेणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते कोकण दौर्यावर येणार
कणकवली – नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या ३ जिल्ह्यांत मोठी हानी झाली आहे. या हानीची पहाणी करण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे नेते २१ मे या दिवशी सिंधुदुर्गच्या दौर्यावर येणार आहेत, अशी माहिती भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याला २ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी
कणकवली – चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भ्रमणभाषवर संपर्क साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच जिल्ह्याला राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या अंतर्गत २ कोटी ५१ लाख रुपयांचा निधी तातडीने दिल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.