पोलिसांच्या सतर्कतेमुळे वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा उपलब्ध

२० रुग्णांचे जीव वाचवण्यात यश


पुणे – कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये रुग्ण संख्या अचानक वाढल्याने ऑक्सिजन आणि अन्य सुविधा मिळणे पुण्यात कठीण झाले आहे. शहरातील एका रुग्णालयात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मोठे संकट निर्माण झाले होते; मात्र पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा होऊन २० रुग्णांचा जीव वाचवण्यात आला. ऑक्सिजनच्या तुटवडयाविषयी कोथरूड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी जवळच्या रुग्णालयातून ऑक्सिजन सिलेंडर आणले; मात्र तेही अल्प पडत आहेत हे लक्षात आल्यावर शिवाजीनगर परिसरातून एस्कॉर्ट करून ऑक्सिजन सिलेंडर आणल्याने २० जणांचे प्राण वाचले.