मुंबई – राज्यातील सर्व रुग्णालयांतील ‘फायर’ आणि ‘ऑक्सिजन’ यांचे लेखापरीक्षण करण्याचे निर्देश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. ऑक्सिजनच्या टँकरांना रुग्णवाहिकेचा दर्जा देण्यात आला असल्यामुळे पोलीस संरक्षणात त्यांची वाहतूक करावी, त्यांना परस्पर वळवू नये, अशी सूचनाही दिली आहे. नाशिक आणि विरार येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तसे निर्देश प्रशासनाला दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या बैठकीला सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक हे ऑनलाईन उपस्थित होते. या वेळी सीताराम कुंटे यांनी राज्यातील ऑक्सिजनच्या साठ्याचा आढावा घेतला.