१. रुग्णाईत असूनही नेहमी सकारात्मक रहाणे
‘गेल्या काही वर्षांपासून मी हसबनीसकाकांना पाहिले आहे. ‘प्रदीप हसबनीसकाका अनेक वर्षे अंथरूणाला खिळून होते; पण त्यांचा तोंडवळा सदैव आनंदी असायचा. मी त्यांना विचारायचे, ‘‘काका तुम्ही कसे आहात ?’’ तेव्हा त्यांचे सदैव सकारात्मक उत्तर असायचे, ‘‘मी एकदम चांगला आहे. मला काय झाले आहे ?’’ खरेतर त्यांची स्थिती पुष्कळ अत्यवस्थ असायची.
२. प्रेमभावाने विचारपूस करणे
मी आश्रमात सेवेसाठी यायचे. त्यामुळे अनेक दिवस आमची भेट होत नव्हती. तेव्हा ते ‘शेजारच्या वहिनी बरेच दिवसांत आल्या नाहीत’, असे हसबनीसकाकूंना विचारायचे. यातून त्यांचा प्रेमभाव जाणवायचा.
३. गुरु आणि संत यांच्याविषयी भाव असणे
काकांना ‘मी आश्रमात जात आहे’, असे सांगितल्यावर ते म्हणायचे, ‘‘तुम्ही नशिबवान आहात. आश्रमातील संतांना माझा नमस्कार सांगा.’’ त्यांना कधीही परात्पर गुरु डॉक्टरांविषयी सांगितले, तर त्यांचा भाव जागृत होत असे. पू. माईणकरआजींना ते आठवणीने नमस्कार सांगायचे आणि ते सतत देवाच्या अनुसंधानात असल्याचे मला जाणवायचे.
४. काकांच्या शरिरात जाणवलेले पालट
अ. त्यांना स्पर्श केल्यावर त्यांची त्वचा पुष्कळ मऊ जाणवून माझ्या अंगावर रोमांच आले आणि माझा भाव जागृत झाला.
आ. त्यांची दृष्टी शून्यात असल्यासारखी जाणवायची.
इ. त्यांचा तोंडवळा गुलाबी झाला होता.
ई. त्यांच्या डोळ्यांत चमक दिसत होती.
गुरुदेवांनीच मला काकांविषयी जाणवलेली सूत्रे लिहायला सुचवले. या असमर्थ आणि अज्ञानी जिवाची त्यांच्या चरणी कृतज्ञता आहे.’
– सौ. अनुराधा पुरोहित, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.११.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |