उत्तरप्रदेशातील धर्मप्रेमींनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा ७८ वा जन्मोत्सव भावसोहळा ‘ऑनलाईन’ पाहिला. त्या वेळी त्यांना आलेल्या अनुभूती पुढे देत आहोत.
१. जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहातांना साधनेविषयीच्या सर्व शंकांचे निरसन होणे
‘जन्मोत्सव कार्यक्रम पहातांना माझ्या मनात साधनेविषयीच्या जेवढ्या शंका होत्या, त्या सर्व शंकांचे निरसन झाले. ‘जीवनातील प्रत्येक प्रसंगात कसा दृष्टीकोन असायला हवा ?’, हे माझ्या चांगल्या प्रकारे लक्षात आले. ‘असे सत्संग नियमित होतात का ? मला तेथे उपस्थित रहायला आवडेल.’ – अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, वाराणसी, उत्तरप्रदेश.
२. जन्मोत्सवाचा कार्यक्रम पहातांना मन भावविभोर होणे आणि ‘समाज परात्पर गुरुदेवांना ओळखत नसल्याने त्यांना स्वतःचे रूप प्रकट करावे लागले’, असे वाटणे
अ. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव कार्यक्रम पहातांना माझे मन पुष्कळ भावविभोर झाले.
आ. ‘महाभारतात अर्जुन भगवान श्रीकृष्णाचे खरे रूप ओळखू शकला नाही; म्हणून श्रीकृष्णाला स्वत:चे विराट रूप त्याला दाखवावे लागले’, असे मला भावसोहळा पहातांना वाटले. समाजही परात्पर गुरुदेवांना ओळखत नाही. ते साक्षात् भगवंत आहेत; म्हणून ‘त्यांना आपले रूप दाखवावे लागत आहे’, असे वाटते.
इ. ‘ते साक्षात् श्रीकृष्ण आहेत’, याविषयी माझ्या मनात दुमत नाही.’
– श्री. आनंद गुप्ता, ‘आनंद लाईट हाऊस अॅण्ड डी.जे.’ चे मालक, वाराणसी, उत्तरप्रदेश.
३. ‘जन्मोत्सव कार्यक्रम पहातांना ‘आम्ही वैकुंठ धामात आहोत’, असे मी अनुभवत होतो, तर कार्यक्रम पहातांना पुष्कळ आनंद होत होता.’
– श्री. राकेश गुप्ता, धर्मप्रेमी हितचिंतक, वाराणसी, उत्तरप्रदेश.
४. भावसोहळा पहातांना ‘पूर्वजन्मामध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले पिता असावेत’, असे वाटणे
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी मंगलमय वातावरणात भावस्थितीचा लाभ झाला, यासाठी मी कृतज्ञ आहे.
माझा उपनयन संस्कार सातव्या वर्षी झाल्यावर माझे दीक्षागुरु, माझे ब्रह्मलीन शाण्डिल्य गोत्रिय पिता पंडित सरस्वती दत्त शर्माच होते. त्यांच्यामुळे नित्यदिनी सायंकाळी आणि प्रातःकालीन संध्योपासना करतांना मी भावस्थिती अनुभवतो. कालच्या सोहळ्यात माझे पिता आणि परात्पर गुरु डॉक्टर यांच्या गुण-संबंधांची प्रचीती त्यांच्या कृपेने आली. मला वाटले, ‘पूर्वजन्मांमध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले माझे पिताच असावेत.’ कार्यक्रमानंतर त्याची जाणीव झाली आणि सहज-भावविभोर स्थिती टिकून राहिली. मला असे वाटते, ‘संध्योपासनेच्या काळात गुरु-पितारूपात त्यांचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) सान्निध्य सहजरूपाने मिळेल.’
आपल्या या निस्वार्थ भेटीमध्ये सूत्ररूपाने आपली कृपा लाभली यासाठी आभार ! परात्पर गुरु डॉक्टर मला पिता समान आहेत. त्यांच्या या करुणामय आणि परम भेटीसाठी त्यांना नित्य नमन !’
– अधिवक्ता श्याम सुंदर त्रिपाठी, प्रयागराज, उत्तरप्रदेश.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |