आज इंग्रजांच्या ‘क्रिकेट’ या खेळाने संपूर्ण देशाला वेडे केले आहे. चापेकर बंधूंना या परकीय खेळाविषयी भयंकर तिटकारा होता. तरुण मुलांनी क्रिकेट या इंग्रजी खेळाकडे वळू नये; म्हणून त्यांनी प्रयत्न केला. जेथे जेथे क्रिकेटचा खेळ चालू असे, तेथे जाऊन तो खेळ ते बंद पाडत. प्रसंगी दोन हातही करत. त्यामुळे अनेक ठिकाणी क्रिकेटचा खेळ बंद पडला. गुलामगिरी मग ती खेळातली का असेना, त्याला त्यांचा विरोध होता. खेळात राजकारण कशाला ? असला खुळचट विचार कुणाच्याही मनात येत नव्हता; कारण राष्ट्र्रनिष्ठा, स्वदेशप्रेम आणि स्वधर्माभिमान हा १०० नंबरी सोन्यासारखा चोख होता.
– श्री. दुर्गेश जयंत परुळकर, डोंबिवली, ठाणे
(संदर्भ : मासिक ‘धर्मभास्कर’, ऑगस्ट २००७)