सोनियाचा दिवस उगवला आज ।

हिंदु राष्ट्राचे ध्येय असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी, १३.५.२०२० या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने देवद आश्रमातील श्री. सुधाकर जोशीआजोबा यांनी दिलेल्या कवितारूपी सदिच्छा पुढे दिल्या आहेत.

श्री. सुधाकर जोशी

सोनियाचा दिवस उगवला आज ।
म्हणूया, ‘जय जय जय जयंत’ ॥ धृ. ॥

हिंदु धर्मासाठी ज्यांनी घेतला अवतार ।
सोनियाचा दिवस उगवला आज ॥ १ ॥

हे परमेश्‍वरा, पुढील कार्यासाठी त्यांचे आयुष्य वाढू दे ।
त्यांच्या कार्याचा अंत कधी न होऊ दे ॥ २ ॥

वाढदिवसाच्या निमित्ताने ।
हे देवतांनो, आकाशातून पुष्पवृष्टी होऊ दे ।
अशा या ऋषिमहात्म्याला आशीर्वाद लाभू दे ॥ ३ ॥

परात्पर गुरु डॉक्टरांना दीर्घायुष्य लाभू दे ।
त्यांच्या कार्याला यश येऊ दे ॥ ४ ॥

आम्ही सर्व साधक किती भाग्यवंत ।
परात्पर गुरु डॉक्टरांचा आहे मी एक भक्त ।
म्हणूया आता सारे ‘जय जय जय जयंत’ ॥ ५ ॥

– श्री. सुधाकर जोशीआजोबा (वय ९१ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१३.५.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक