सर्व करी पहा कसे कुशलतेने परात्पर गुरुरूपी हरि ।

श्री. विलास महाडिक

ही हिंदु राष्ट्राची सुंदर गुढी डौलाने उभी केली, कुणी बरे ? ।
हे दिव्य स्वप्न (टीप १) दिधले, सत्यात ते उतरविले, कुणी बरे ? ॥ १ ॥

हा गुरुकृपायोगाचा प्याला सारा अमृताने भरला, कुणी बरे ? ।
ही जादुई प्रक्रिया निर्मिली, अंतःकरणाने निर्मल केली, कुणी बरे ? ॥ २ ॥

हे भव्य सत्संग निर्मिले, भावामृताने सारे भरले, कुणी बरे ? ।
अमूल्य ग्रंथ संकलित केले, आनंदस्वरूप ठेवा दिधला, कुणी बरे ? ॥ ३ ॥

हे वैकुंठरूपी आश्रम उभारले, प्रीतीने सारे भरले, कुणी बरे ? ।
ही साधक-फुले सुगंधित केली, रंगांनी (गुणांनी) सारी भरली, कुणी बरे ? ।
या घोर आपत्काली, रक्षिले तळहातीच्या फोडापरी, कुणी बरे ? ॥ ४ ॥

हे करी सर्व तो हरि(टीप २), कुशल बहु परि जयाची माया ।
रक्षितो सार्‍या जगाला, चला सारे नमूया तया ॥ ५ ॥

टीप १ : हिंदु राष्ट्र स्थापनेचे
टीप २ : परात्पर गुरु डॉ. आठवले

– श्री. विलास महाडिक, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.४.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक