‘जानेवारी २०२० मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात शिबिरासाठी मी गेले होते. शिबिर संपण्याच्या आदल्या रात्री मला एक स्वप्न पडले. स्वप्नात मला पू. भावनाताई (एस्.एस्.आर्.एफ्.च्या संत पू. (सौ.) भावना शिंदे) भजने म्हणतांना दिसल्या. आम्हा (विदेशी) साधकांना त्या भजनांचा भावार्थही कळत होता. त्यांत ‘साधना कशी करावी ?’, आणि ‘भावजागृती’ यांसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले होते. दुसर्या दिवशी सकाळी उठल्यावर मी भावावस्थेत होते. आदल्या रात्री अल्प झोप मिळूनसुद्धा मी सकाळी सहजपणे उठू शकले आणि दिवसभर मला पुष्कळ उत्साही वाटत होते. मी एका साधिकेला मला पडलेल्या स्वप्नाविषयी सांगितले. तेव्हा ती साधिका मला म्हणाली, ‘‘प्रत्यक्षातही पू. भावनाताई भजने म्हणतात आणि त्यांचा आवाज फार छान आहे.’’ ‘स्वप्नाच्या माध्यमातूनसुद्धा देव वस्तुस्थिती सांगत असतो’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मला दाखवले’, असे मला जाणवले. त्यामुळे ‘दिवसभरात देव मला कोणते विचार देत आहे ?’, याविषयी मी सजग रहाण्याचा प्रयत्न करीन. मला ही अनुभूती दिल्याबद्दल मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
– गेर्लिंडे दोम्ब्रोव्हस्की, ऑस्ट्रिया (९.१.२०२०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |