दंगलसदृश भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी स्वयंसूचना देऊन मनोबल वाढवा !

आज कित्येक वर्षे संपूर्ण भारतभरात किरकोळ निमित्त काढून धर्मांध विशेषतः हिंदूंच्या सणांच्या वेळी दंगली घडवून आणत आहेत. बाबरी मशीद पाडल्यावर मुंबईत झालेली दंगल, धुळे दंगल, आझाद मैदानातील दंगल, सीएए कायद्यावरून झालेल्या आंदोलनानंतर देहलीत झालेली दंगल आणि शेतकरी आंदोलनानंतर २६ जानेवारीला झालेली दंगल ही काही उदाहरणे आहेत. दंगलींमध्ये होणार्‍या हत्या, जाळपोळ, मारहाण, स्त्रियांवरील अत्याचार, पोलिसांवरील जीवघेणी आक्रमणे आदी पाहिल्यावर सर्वसामान्यांच्या उरात अक्षरशः धडकी भरते. ‘येणार्‍या आपत्काळातही पूर्वनियोजित दंगली होऊ शकतात’, या विचाराने ताण येऊ शकतो.

पूर, भूकंप, दंगल, महायुद्ध इत्यादी आपत्तींच्या वेळी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी सर्वत्र विध्वंस होणे, आग लागणेे, गल्लोगल्ली मृतदेह पडलेले असणे यांसारखी स्थिती समोर असते. अशा घटना पाहून वा ऐकून अनेकांना मन अस्थिर होणे, ताण येणे, काळजी वाटणे, भीती वाटणे, परिस्थिती स्वीकारता न येणे इत्यादी त्रास होतात. बर्‍याच जणांना भविष्यकाळात येऊ शकणार्‍या अशा आपत्तींच्या कल्पनेनेही वरील प्रकारचे त्रास होतात, तसेच नातेवाइकांतही भावनिकदृष्ट्या अडकायला होते. अशा प्रकारचे त्रास होऊ नयेत, म्हणजेच मनाचे संतुलन ढळू न देता प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी ‘स्वयंसूचना’ घेऊ शकतो. आपत्काळातील अशा भीषण परिस्थितीला सामोरे जाता येण्यासाठी मनोबल निर्माण व्हावे, यासाठी ‘स्वयंसूचना-उपचारपद्धती’चा वापर करावा. त्यामुळे मनावरील ताण दूर होईल !

स्वयंसूचना सत्र म्हणजे काय आणि ते कसे करावे ?

स्वभावदोषांवर आवश्यक ती सूचना बाह्यमनाने अंतर्मनाला देण्याच्या प्रक्रियेला ‘स्वयंसूचना सत्र’ म्हणतात. उपास्यदेवता किंवा गुरु यांना ‘स्वयंसूचना माझ्या अंतर्मनापर्यंत पोचू दे’, अशी प्रार्थना करावी. मन एकाग्र होण्यासाठी २ मिनिटे नामजप करून स्वयंसूचना द्यावी आणि शेवटी कृतज्ञता व्यक्त करावी. ही सूचना ५ वेळा एकाग्रतेने वाचावी किंवा मनात म्हणावी. अशी सूचनेची ५ ते १० सत्रे करावीत. अल्पावधीत मनावरील ताण दूर झाल्याचे लक्षात येईल.

‘स्वतःच्या घराजवळ दंगल होईल’, या विचारामुळे आलेला ताण दूर होण्यासाठी द्यायच्या स्वयंसूचना

उदाहरण १

‘आपत्काळाची तीव्रता आता वाढतच जाणार आहे. त्यामुळे पुढील १ – २ वर्षांत माझ्या घराजवळ दंगल होईल आणि तिची झळ मला अन् माझ्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात बसेल’, या विचाराने श्री. प्रभाकर यांना ताण येतो.

स्वयंसूचना : ज्या वेळी माझ्या मनात ‘माझ्या घराजवळ दंगल होईल आणि तिची झळ मला अन् माझ्या कुटुंबाला मोठ्या प्रमाणात बसेल’, असे विचार येतील, त्या वेळी ‘मी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेतले आहे; त्यामुळे मी दंगलखोरांना रोखू शकेन, एवढा आत्मविश्‍वास मला आला आहे. आम्ही कुटुंबीय करत असलेल्या साधनेमुळे देवाचे संरक्षक-कवचही आमच्याभोवती आहेे’, याची मला जाणीव होईल. हे सर्व लक्षात घेऊन मी माझ्या साधनेवर लक्ष केंद्रीत करीन.

‘माझ्या घराजवळ दंगल झाली तर…’ या विचारवरील स्वयंसूचना

उदाहरण २

स्वयंसूचना

१. काल शहरात चालू झालेल्या दंगलीचे पडसाद आमच्या गल्लीत उमटू लागले आहेत. आमच्या घराजवळ दंगल चालू झाली आहे.

२. मी ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ घेतले आहे; त्यामुळे मी दंगलखोरांना रोखू शकेन, एवढा आत्मविश्‍वास मला आला आहे.

३. आम्ही आमच्या घराचे प्रवेशद्वार, तसेच अन्य दरवाजे आणि खिडक्या बंद करून घेत आहोत.

४. माझा मोठा भाऊ पोलिसांना दूरभाष करून दंगलीविषयी कळवत आहे.

५. संकटनिवारणासाठी नामजप, स्तोत्रपठण यांसारखे जे जे प्रयत्न करणे शक्य आहे, ते ते सर्व मी करत आहे.

६. ‘संकटकाळी देव नेहमीच माझ्या समवेत असून तो माझी आणि माझ्या कुटुंबियांची काळजी घेणारच आहे’, ही माझी श्रद्धा वाढत आहे.

७. देवाच्या कृपेने दंगलखोरांचे लक्ष आमच्या घराकडे गेलेले नाही.

८. थोड्या वेळाने ‘पोलीस तेथे आले आहेत’, असे जाणवत आहे.

९. काही वेळातच पोलीस दंगल नियंत्रणात आणत आहेत.

१०. ‘देवाने दंगलीची झळ आम्हाला लागू दिली नाही, तसेच माझे आणि माझ्या कुटुंबियांचे रक्षण केले’, यासाठी मी देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करत आहे.

(अधिक माहितीसाठी संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘आपत्काळ सुसह्य होण्यासाठी मानसिक, आध्यात्मिक स्तरांवर करायच्या सिद्धता’)