हिंदी भाषित तपासनिसाला मराठी बोलण्यास सांगितल्याचे प्रकरण

मुंबई – मीरारोड ते दादर या स्थानकांच्या तिकीट तपासनिसाने हिंदीतून तिकिटाची विचारणा केली. या वेळी तुकाराम मेंडगे यांनी त्याचा पास दाखवून मराठीत बोलण्याचा आग्रह धरला. ते पाहून अन्य तिकीट तपासनिसांनी एकत्र येऊन त्यांना दमदाटी करण्यास आरंभ केला. तिकीट तपासनिसाने मेंडगे यांना दादर येथे जायचे असूनही बळजोरीने अंधेरी रेल्वेस्थानकात उतरवून रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात २ घंटे डांबून ठेवले.
‘या प्रकरणी पश्चिम रेल्वेने क्षमायाचना करावी, संबंधित तिकीट तपासनिसांवर गुन्हे नोंद करावेत, अन्यथा १५ जुलै या दिवशी रेल्वेच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी ‘मराठी एकीकरण समिती’ने दिली आहे.
‘मराठीत संवाद साधण्यास सांगणे, हा सरकारी कामात अडथळा ठरत नाही, असे समितीने म्हटले आहे. कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता प्रवाशाला कह्यात ठेवणे हे नागरिकांच्या भाषिक हक्काचे उल्लंघन आहे, असे समितीने म्हटले आहे.
ठाणे येथे माजी खासदार विनायक राऊत आणि कुटुंबिय यांच्याविरुद्ध जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद
मुंबईतील ताज हॉटेलला बाँबची धमकी अफवाच : आरोपीचा शोध चालू
मराठी नामफलक न लावणार्या मुंबईतील ६ सहस्रांहून अधिक आस्थापनांवर कारवाई !
१७ जुलैपासून प्रारंभ होणार भारताची पहिली हायड्रोजन इंधनावरील रेल्वेगाडी
कांदिवली येथे तरुणाकडून अल्पवयीन मुलीची हत्या !
‘आय.एन्.एस्. महेंद्रगिरी’ या युद्धनौकेचा नौदलाच्या ताफ्यात समावेश !