अमरावती जिल्हा परिषद आणि ‘क्वेस्ट’ संस्था यांचा स्तुत्य अभिनव प्रयोग !

अमरावती – मेळघाटातील कोरकू भाषिक विद्यार्थ्यांना मराठी शिकतांना भाषेची अडचण येऊ नये आणि वर्गातील शिक्षक विद्यार्थ्यांचा संवाद हिंदीऐवजी थेट मराठीत व्हावा अन् विद्यार्थ्यांच्या मातृभाषेचाच आधार घ्यावा, या उद्देशाने चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ‘अरीटे इठूबा’ अर्थात् ‘आनंदाने शिकूया’ या बहुभाषिक शिक्षण केंद्राचा प्रारंभ करण्यात आला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषा आणि शिक्षकांनाही कोरकू भाषा शिकता येणार असून संवाद परिणामकारक होईल. हा उपक्रम जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आयुक्त संजीता महोपात्रा यांच्या संकल्पनेतून अन् ‘क्वेस्ट’ संस्थेच्या माध्यमातून साकार झाला.
१. फळा, दप्तर, पुस्तक, दिनदर्शिका, आरसा, कंगवा, खिडकी आणि झाडे अशा दैनंदिन वापरातील वस्तूची नावे कोरकू अन् मराठी अशा भाषांमध्ये आकर्षक फलकांद्वारे वर्गात प्रदर्शित केली आहेत. यामुळे विद्यार्थी मराठी शब्द आत्मसात करत आहेत, तर शिक्षकांनाही कोरकूचे ज्ञान मिळत आहे.
२. यासाठी ‘टाटा ट्रस्ट’, ‘इंदिरा फाउंडेशन’ आणि ‘मोटिव्हेशन फॉर एक्सलन्स’ या संस्थांचे आर्थिक सहकार्य लाभले आहे. ‘क्वेस्ट’मुळे मेळघाटातील शिक्षण क्षेत्राला दिशा मिळेल, असा विश्वास आहे.
गुरुदत्त सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि कला व क्रीडा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अर्जुनराव फडके यांना ‘सामाजिक कार्यगौरव’ पुरस्कार
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !