पुणे येथे सार्वजनिक हळदी-कुंकू कार्यक्रमाच्या प्रकरणी भाजपच्या नगरसेविकेवर गुन्हा नोंद

नियम मोडणार्‍यांमुळेच कोरोना आटोक्यात येण्याऐवजी वाढत आहे, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ?

पुणे – शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतांना भाजपच्या नगरसेविका विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी महात्मा फुले वाडा रस्त्यावर पोलिसांची अनुमती न घेताच महिलांच्या हळदी-कुंकूवाचा कार्यक्रम केला. या कार्यक्रमास अनुमाने २ सहस्र महिलांची उपस्थिती होती. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात पोलिसांच्या शासकीय नियमावलीचे पालन न करणे, पूर्व अनुमती न घेणे, सार्वजनिक रस्त्यावर विनापरवाना मंडप उभारणे, तिळगूळ वाटप करीत भेटवस्तूंचे वाटप करणे, गर्दी जमवणे आदी कारणे देत पोलिसांनी नगरसेविकेसह तिघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. विशेष म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.