हिंदु नाव धारण करून सुरक्षारक्षकाची नोकरी करणार्‍या धर्मांधाकडून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या !

अशा विकृत वासनांध धर्मांधाचा जलद गती न्यायालयात खटला चालवून त्याला फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत; मात्र बंगालमध्ये मुसलमानप्रेमी ममता(बानो) यांचे सरकार असल्याने असे काही होण्याची शक्यता अल्पच आहे !

जोडाबागान (बंगाल) – येथे ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी महंमद हनीफ याला अटक केली आहे. तो गेली १२ वर्षे स्वतःची ओळख राम कुमार उपाख्य लंबू असे सांगून येथे सुरक्षारक्षकाची नोकरी करत होता. तो झारखंड येथील रहाणारा असल्याचे त्याने सांगितले होते.

यासाठी खोटी कागदपत्रेही बनवली होती. हनीफ याने खाऊचे आमीष दाखवून या मुलीला स्वतःच जवळ बोलवून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली होती.