दैनंदिन आचारासंबंधी नाविन्यपूर्ण संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
१९ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या जागतिक सूर्यनमस्कारदिनाच्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाने केलेले संशोधन
माघ मासात सूर्योदय व्यापिनी शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते. सूर्यापासून आरोग्य प्राप्त होत असल्याने या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात. या दिवशी रथाधिष्ठित सूर्याचे पूजन करून सूर्यनमस्कार घालतात. या दिवसाला जागतिक सूर्यनमस्कारदिन म्हणतात. सूर्यनमस्कार घातल्याने व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर काय परिणाम होतो ?, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि निष्कर्ष पुढे दिले आहेत.
१. सूर्यनमस्काराचे महत्त्व
आदित्यस्य नमस्कारं ये कुर्वन्ति दिने दिने ।
जन्मान्तरसहस्त्रेषु दारिद्य्रं नोपजायते ॥
अर्थ : जे सूर्याला प्रतिदिन नमस्कार करतात, त्यांना सहस्रो जन्मांत दारिद्य्र येत नाही.
२. सूर्यनमस्कार घातल्याने होणारे लाभ
अ. सर्व महत्त्वाच्या अवयवांचा रक्तपुरवठा वाढतो.
आ. हृदय आणि फुप्फुसे यांची कार्यक्षमता वाढते.
इ. बाहू आणि कंबर यांचे स्नायू बळकट होतात.
ई. पाठीचा मणका आणि कंबर लवचिक होतात.
उ. पोटाजवळची चरबी वितळून वजन न्यून होण्यास साहाय्य होते.
ऊ. पचनक्रिया सुधारते.
ए. मनाची एकाग्रता वाढते.
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’
जागेअभावी या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.
३. सूर्यनमस्कार सूर्याची नावे न घेता आणि सूर्याची नावे घेऊन घातल्याचा व्यक्तीच्या सूक्ष्म ऊर्जेवर होणार्या परिणामाचा युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) या उपकरणाच्या माध्यमातून केलेला अभ्यास
हा अभ्यास १ पुरुष आणि १ स्त्री अशा २ साधकांवर करण्यात आला. यासाठी पुढीलप्रमाणे चाचणी करण्यात आली.
अ. सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी दोघांची यू.ए.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. ही त्यांच्या मूळ स्थितीची नोंद होय.
आ. त्यानंतर दोघांनीही प्रत्येकी १२ सूर्यनमस्कार सूर्याची नावे न घेता घातल्यावर त्यांची पुन्हा यू.ए.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांतून त्यांच्यावर सूर्यनमस्कार सूर्याची नावे न घेता घातल्याचा सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर झालेला परिणाम लक्षात आला.
इ. दुसर्या दिवशी दोघांची परत मूळ स्थितीची नोंद केल्यावर त्यांनी १२ सूर्यनमस्कार सूर्याची नावे घेऊन घातले. त्यानंतर त्यांची यू.ए.एस्. उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या निरीक्षणांतून त्यांच्यावर सूर्यनमस्कार सूर्याची नावे घेऊन घातल्याचा सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर झालेला परिणाम लक्षात आला.
वरील चाचणीतील निरीक्षणे पुढीलप्रमाणे होती.
वरील सारणीतून पुढील सूत्रे स्पष्ट होतात.
१. पुरुष साधकामध्ये सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी असलेली नकारात्मक ऊर्जा त्याने सूर्यनमस्कार दोन्ही प्रकारे घातल्यानंतर नाहीशी झाली.
२. पुरुष साधकामधील सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी असलेली सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सूर्याची नावे न घेता ते घातल्यावर २.३९ मीटरने, म्हणजे दुप्पटपेक्षा अधिक वाढली. त्याने ते सूर्याची नावे घेऊन घातल्यावर ४.१७ मीटर अशी त्याहूनही अधिक वाढली.
३. स्त्री साधिकेमध्ये नकारात्मक ऊर्जा नव्हती. तिच्यामध्ये सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी असलेली सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ सूर्याची नावे न घेता ते घातल्यावर ३.०५ मीटरने वाढली, म्हणजे दुपटीपेक्षा अधिक वाढली. तिने सूर्यनमस्कार सूर्याची नावे घेऊन घातल्यानंतर ४.६६ मीटर अशी त्याहूनही अधिक वाढली.
४. चाचणीचा निष्कर्ष – सूर्यनमस्कार घातल्याचा आध्यात्मिक स्तरावर पुष्कळ लाभ होणे; परंतु तो नामजपासहित घातल्याने अधिक प्रमाणात लाभ होणेे : या चाचणीतून सूर्यनमस्कार घातल्यामुळे सूक्ष्म ऊर्जेच्या स्तरावर होणारा लाभ लक्षात आला. हा लाभ सूर्यनमस्कार नामजप करत केल्यावर अधिक वाढतो. हे लाभ पहाता ५ सहस्र वर्षांपूर्वी आपल्या ऋषि-मुनींनी कोणत्याही बाह्य, स्थूल उपकरणाच्या आधारावाचून अद्वितीय अशा योगासनांची निर्मिती केली, हे लक्षात येते. यांना चैतन्यमय नामजपाची जोड दिल्यावर लाभात होणारी वृद्धी पहाता, आपल्या ऋषि-मुनींप्रती कृतज्ञता व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात आणि त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायला होते.
आजच्या धकाधकीच्या जीवनात सूर्यनमस्कार घालणे हा उत्तम पर्याय आहे; कारण एक सूर्यनमस्काराच्या अंतर्गत एकूण १२ योगासने येतात. या चाचणीतून नामजपासहित योगासने केल्याचा लाभ लक्षात घेऊन अधिकाधिक व्यक्ती यांना नामजपासहित आपल्या दिनचर्येत अंतर्भूत करून घेवोत, ही ईश्वचरणी प्रार्थना ! (१८.६.२०२०)
– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |