केरळ येथील ‘हिंदु ‘हेल्पलाईन’चे राज्य अध्यक्ष श्री. बिनिल सोमसुंदरम् यांचा सनातन संस्थेच्या संतांविषयी असलेला अपार भाव !

सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

१. श्री. बिनिल सोमसुंदरम् यांनी केरळ येथे हिंदुत्वासाठी कार्य करणारी संस्था स्थापण्याचे नियोजन करणे

‘केरळ येथील ‘हिंदु ‘हेल्पलाईन’चे राज्य अध्यक्ष श्री. बिनिल सोमसुंदरम् यांनी वर्ष २०२१ मध्ये वसंतपंचमीला ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’ या नावाने हिंदुत्वासाठी कार्य करणार्‍या एका संस्थेच्या स्थापनेचे नियोजन केले आहे. ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’ या संस्थेच्या माध्यमातून ‘हिंदूंना धर्म आणि अध्यात्म यांविषयीचे शिक्षण देण्यासाठी सनातन धर्मपीठम्, दरिद्री हिंदूंना अन्न देण्यासाठी अन्नपूर्णा केंद्र, योग अन् प्राकृतिक चिकित्सा यांचे संगोपन करण्यासाठी योगदा, हिंदु युवकांना आपत्कालीन प्रशिक्षण देणे आणि हिंदु धर्मावर होत असलेल्या आक्रमणांविरुद्ध न्यायालयीन लढा देण्यास इच्छुक अधिवक्त्यांसाठी सनातन अधिवक्ता परिषदेच्या (कौन्सिलच्या) माध्यमातून कार्य करणे’, असे कार्य करण्याचा त्यांचा मानस आहे.

श्री. बिनिल सोमसुंदरम्

२. ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’चा शुभारंभ संतांच्या हस्ते व्हावा’, अशी श्री. बिनिल सोमसुंदरम् यांची इच्छा आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांचे त्यांना लाभलेले आशीर्वाद !

२ अ. श्री. बिनिल सोमसुंदरम् यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’च्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने शुभाशीर्वादात्मक ध्वनीचित्रफीत करून पाठवणे : ‘या संस्थेच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने श्री. बिनिल सोमसुंदरम् यांनी ‘सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या प्रवक्त्यांच्या शुभेच्छा देणार्‍या ध्वनीचित्रफिती प्राप्त होतील का ?’, असे विचारले होते. त्यांच्या या धार्मिक कार्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी शुभाशीर्वादात्मक ध्वनीचित्रफीत करून पाठवली. त्यामध्ये सद्गुरु पिंगळेकाकांनी ‘हिंदुत्वाच्या या कार्यासाठी कार्यकर्त्यांना बळ मिळो आणि ईश्‍वराचे आशीर्वाद मिळो’, अशी ईश्‍वराला प्रार्थना केली अन् ‘हिंदु जनजागृती समिती अशा कार्य करणार्‍यांच्या साहाय्याला सदैव तत्पर असते’, असे म्हटले आहे.

२ आ. ध्वनीचित्रफीत पाहून ‘जणू परात्पर गुरु डॉ. आठवले यांचेच आशीर्वाद मिळाले’, असे वाटून श्री. बिनिल सोमसुंदरम् यांची पुष्कळ भावजागृती होणे : सद्गुरु डॉ. पिंगळेकाकांच्या शुभाशीर्वादाची ध्वनीचित्रफीत पाहून श्री. बिनिल यांची भावजागृती झाली. ‘अन्नपूर्णा फाऊंडेशन’चा आरंभ कुणा संतांच्या हस्ते झाला पाहिजे’, असे त्यांच्या मनात होते. त्यांची ती इच्छा ईश्‍वराने पूर्ण केली. ‘हिंदुत्वाचे कार्य करण्यासाठी जणू त्यांना परात्पर गुरुदेव डॉ. आठवले यांचेच आशीर्वाद मिळाले’, असे वाटून एक घंटा त्यांच्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते.’

– कु. रश्मी परमेश्‍वरन्, कोची, केरळ. (५.२.२०२१)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक