मुलाच्या व्यसन-मुक्तीसाठी अनेक उपाय करूनही पालट न होणे; पण एका साधिकेने सांगितलेले आध्यात्मिक उपाय करण्याने त्याच्यात पुष्कळ पालट होणे आणि त्यामुळे आध्यात्मिक उपायांचे महत्त्व लक्षात येणे !
‘माझा मोठा मुलगा मद्यपान करून घरी येत असे. हा त्याचा नाद सुटण्यासाठी मी पुष्कळ डॉक्टर, मांत्रिक, व्यसन मुक्त करणारे आणि विज्ञापन देणारे या सर्वांकडे जाऊन कंटाळलो होतो. काहीच फरक पडला नाही. नंतर मी याविषयी सौ. भक्ती महाजन यांना सांगितले. त्यांनी दोन नारळ आणून त्याच्यावरुन उतरून महालक्ष्मी मंदिरात वाढवण्यास सांगितले. दुसरा नारळ त्याच्यावरून उतरवून कचराकुंडीपाशी ठेवायला सांगितले. तसेच तो झोपल्यावर उशीखाली दैनिक ‘सनातन प्रभात’ ठेवायला सांगितले. तेव्हापासून तो थोडा शांत आहे. आता तो पूर्वीपेक्षा बरा आहे. ‘परात्पर गुरुदेवा ही आपलीच कृपा आहे.’
– श्री. गुणाजी गणपत शिर्के, कल्याण, जिल्हा ठाणे. (३१.१.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |