समाज माध्यमातून ओळख वाढवण्याचा धर्मांधाने केला प्रयत्न
समाजमाध्यमांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी शासन, शाळा आणि पालक या तिघांनीही पाल्यांवर बंधने घालायला हवीत !
सोलापूर – अल्पवयीन मुलीसमवेत धर्मांध साकीब शाकीर कुरेशी याने समाज माध्यमातून ओळख करून तिच्याशी जवळीक वाढवली, तसेच तिला चित्रपट पहाण्याच्या बहाण्याने दुचाकीवरून नेऊन अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी कुरेशी आणि त्याचा सहकारी विनय कुलकर्णी या दोघांविरोधात २४ घंट्यात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले आहे. (हिंदूंनो, आपल्या मुलीचे वासनांध धर्मांधांपासून रक्षण करण्यासाठी लहानपणापासूनच धर्मशिक्षण द्या ! – संपादक)
या दोन्ही आरोपींविरोधात ४ जानेवारी या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला होता. विनयभंग, बाललैंगिक अत्याचार आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला होता. सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. प्रीती टिपरे यांनी या घटनेचे अन्वेषण केले.