४ बैल आणि पिकअप वाहन कह्यात
गोवंशहत्या बंदी कायद्यानुसार प्रत्येकच वेळी कठोर कार्यवाही होणे आवश्यक !
सातारा, ५ जानेवारी (वार्ता.) – गोवंशियांची अमानुषपणे वाहतूक करणार्या महंमद अली सलीम कुरेशी यांच्यावर सातारा तालुका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी पिकअप वाहन आणि ४ बैल असा ५ लाख ४० सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला आहे. या कारवाईत एक जण पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
वाई तालुक्यातील केंजळ येथून एका पिकअप गाडीमधून ४ बैल पशूवधगृहाकडे पाठवले जात असल्याची माहिती येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्यांना मिळाली. त्यांनी गाडीचा पाठलाग केला; मात्र चालक गाडी वेगाने चालवत होता. पुढे नागेवाडी येथे गाडी थांबवण्यात धारकर्यांना यश आले. धारकर्यांनी गाडी थेट पोलीस ठाण्यात नेली. त्यानंतर वरील कारवाई झाली.