आता पॅरेशूट आस्थापनाच्या खोबरेल तेलालाही ‘हलाल’ प्रमाणपत्र !

धर्माभिमानी हिदूंकडून तेलावर बहिष्कार

पनवेल – पॅरेशूट आस्थापनाच्या खोबरेल तेलाच्या बाटलीवर ‘हलाल’ प्रमाणपत्राचे चिन्ह दिसत आहे. हलाल प्रमाणपत्र घेण्यासाठी देण्यात येणारा पैसा हा आतंकवाद्यांना पुरवला जात असल्याचे सांगितले जाते. हलाल प्रमाणपत्र देणारे आंतरराष्ट्रीय आस्थापन ‘हलाल’च्या नावालाखाली भारतीय शाकाहारी उत्पादने, सौंदर्यप्रसाधने, इतकेच काय इमारती, रुग्णालये, संकेतस्थळे आदी सर्वच गोष्टींसाठी हलाल प्रमाणपत्र घेण्यास बाध्य करत आहे.

(चित्रावर क्लिक करा)

उत्पादनांच्या विदेशी विक्रीसाठी आस्थापने हे प्रमाणपत्र घेत आहेत, त्याप्रमाणे भारतातील धर्मांधही हलाल प्रमाणपत्राचा जोर धरू लागले आहेत.

त्यामुळे आता धर्माभिमानी हिंदूही या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राविरुद्ध जागरूक झाले आहेत. पनवेल येथील काही धर्माभिमानी हिंदूंनी त्यांचा पैसा आतंकवाद्यांना जाऊ नये यासाठी ‘हलाल’ प्रमाणपत्र असलेल्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यास आरंभ केला आहे.