दमोह (मध्यप्रदेश) येथे गोवंशाची तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या हिंदु तरुणाची धर्मांधांकडून हत्या !  

  • मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना आणि तेथे गोहत्या बंदी असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
  • धर्मांधांचे अत्याचार थांबण्यासाठी हिंदूंनी शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासह साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक !
आंदोलन करताना हिंदुत्ववादी संघटना

दमोह (मध्यप्रदेश) – येथे काही जण अवैधरित्या गोवंश घेऊन जात असतांना त्यांना दोघा तरुणांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी कसायांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक आक्रमण केले. यात अजय मुडा हा तरुण शिक्षक ठार झाला. ही घटना २८ डिसेंबरच्या रात्री घडली. या घटनेची माहिती मिळाल्यावर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने केली. ‘जर पोलिसांनी धर्मांधांवर कारवाई केली नाही, तर आंदोलन करण्यात येईल’, अशी चेतावणी त्यांनी दिली. पोलिसांनी रियाज, शमीम, कय्यूम आदींच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

मृतांच्या नातेवाइकांनी तरुणाचा मृतदेह येथील घंटाघर येथे रुग्णवाहिकेतून नेल्यावर तेथे हिंदुत्वनिष्ठांनी न्याय मिळण्यासाठी आंदोलन चालू केले. तरुणाचा मृतदेह रुग्णावाहिकेतून बाहेर काढण्यास पोलिसांनी नकार दिल्यावर त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी मृतदेह आंबेडकर चौकात नेला आणि तेथे आंदोलन केले. (हिंदूंच्या न्याय मिळण्यासाठी नेहमीच आंदोलन का करावे लागते ? – संपादक) हिंदुत्वनिष्ठांचे म्हणणे होते की, जोपर्यंत धर्मांधांना अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार केला जाणार नाही. पोलिसांनी नंतर समजावण्याचा प्रयत्न केल्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (हिंदूंनी पोलिसांवर विश्‍वास न ठेवता न्याय मिळेपर्यंत पोलिसांचा पाठपुरावा घेणे अपेक्षित आहे ! – संपादक)