पाकमध्ये १३ वर्षांच्या ख्रिस्ती मुलीचे धर्मांधांकडून अपहरण, बलात्कार, धर्मांतर आणि विवाह !

  • पोलिसांकडून आरोपींचा बचाव

  • पाकमध्ये न्याय मिळणे अशक्य ! – मुलीच्या पित्याची खंत

पाकमध्ये अल्पसंख्यांकांवर होणार्‍या अत्याचारांविषयी मानवाधिकार संघटना, संयुक्त राष्ट्रे मौन का आहेत ?

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकमधील लाहोर शहरातील कंजरा भागातून एका १३ वर्षांच्या ख्रिस्ती मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कारानंतर तिचे धर्मांतर आणि विवाह करण्यात आल्याची घटना घडली. याविषयी पाकमधील मानावधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी या मुलीच्या वडिलांचा व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात ते त्यांच्या मुलीवरील अत्याचारांची माहिती देत आहेत. या प्रकरणी त्यांनी साजिद अली, सुमैरा आणि तारव या तिघांवर आरोप केला आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी करतांना ती अल्पवयीन असल्याची आणि तिचे बलपूर्वक धर्मांतर झाल्याची चौकशी करून तिच्या वडिलांनी सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचे सांगत कारवाई करण्यास नकार दिला. वडिलांनी आरोप केला आहे मुलीचा विवाह लावून देण्यात आलेली आणि धर्मांतराची सर्व कागदपत्रे खोटी आहेत.

१. या घटनेविषयी मुलीच्या वडिलांनी मंत्री जाहज आलम घस्ती यांच्याकडे साहाय्य मागण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांनी तो केला नाही. जर पंतप्रधान, मंत्री, मुख्य न्यायाधीश आणि संसद जर माझे ऐकत नाहीत अन् माझ्या मुलीची सुटका करत नाहीत, तर मी माझ्या कुटुंबासह मरण्यासाठी बाध्य होईन. पाकमध्ये न्याय मिळणे अशक्य झाले आहे. मला न्याय तेव्हाच मिळेल, जेव्हा माझी मुलगी परत येईल. माझे बोलणे गांभीर्याने घ्या. मी सांगत आहे, तेच करणार आहे.

२. ‘सॉलिडॅरिटी अँड पीस मूव्हमेंट’च्या माहितीनुसार प्रतिवर्षी १२ ते २५ वर्षांच्या वयातील सुमारे १ सहस्र हिंदु आणि ख्रिस्ती मुलींचे अपहरण, बलात्कार, धर्मांतर आणि नंतर त्यांचा विवाह केला जातो.