१. लंघन : कडकडून भूक लागेपर्यंत काहीही न खाणे. भूक लागल्यावरही साळीच्या लाह्यांचे पाणी, मूगाचे कढण, पेज, मऊ भात असा आहार क्रमाक्रमाने घेणे.
२. स्वेटर, कानटोपी, ब्लँकेट इत्यादींचा वापर करून ‘घाम काढणे’.
३. उकळून निम्मे आटवलेले पाणी; तेदेखील तहान लागल्यावरच पिणे किंवा वैद्यांच्या सल्ल्याने षडंगपानीय (औषधी पाणी) घेणे.
४. अंघोळ न करणे.
५. पूर्ण बरे होईपर्यंत आराम.
ताप आलेला असतांना वरील पंचसूत्री अत्यावश्यक.
– वैद्य परीक्षित शेवडे, आयुर्वेद वाचस्पति, डोंबिवली, जिल्हा ठाणे.