‘मनोरुग्ण असलेल्या नातेवाइकांना भेटण्याच्या निमित्ताने मी एका मनोरुग्णालयात गेले होते. त्या वेळी मी तेथे असलेल्या रुग्णांची दयनीय आणि चिंताजनक अशी शारीरिक, मानसिक अन् बौद्धिक स्थिती पाहिली. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधने’च्या अंतर्गत ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया ’(टीप १) राबवणे मनुष्य जीवनात अत्यंत आवश्यक आहे’, हे माझ्या लक्षात आले.
(टीप १ : स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया- स्वतःमधील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करण्यासाठी प्रतिदिन स्वतःकडून झालेल्या अयोग्य कृती आणि विचार वहीत लिहून त्यापुढे योग्य कृती आणि विचार लिहिणे अन् दिवसातून १० ते १२ वेळा मनाला तशी सूचना देणे.)

१. मनोरुग्णालयात नातेवाइकांना भेटायला गेल्यावर जाणवलेली सूत्रे

१ अ. मनोरुग्णांची गंभीर स्थिती
१. एक मनोरुग्ण प्रत्येक कृती २ वेळा करत असे. तसे केले नाही, तर त्याला प्रचंड ताण येऊन तो अस्वस्थ होत असे. त्यामुळे त्याचे जगणे असह्य झाले होते. हा रुग्ण प्रत्येक कृती दोन वेळा करायचा, उदा. घरातून बाहेर पडतांना दारातून २ वेळा आत-बाहेर करणे, २ वेळा हातात घड्याळ घालणे, २ वेळा लागोपाठ जेवणे, तहान लागल्यावर २ वेळा पाणी पिणे इत्यादी. त्याने एखादी कृती केली की, तीच कृती तो दुसर्यांदा लगेच करत होता.
२. दुसरा रुग्ण पूर्वी राजकीय क्षेत्रात काम करत होता. तिथे घडलेल्या प्रसंगांना सकारात्मकरित्या सामोरे जाता न आल्याने आणि घडलेले प्रसंग स्वीकारता न आल्याने त्याला प्रचंड निराशा येऊन निष्क्रियता आली होती. परिणामी तो स्वतःचे ‘माणूस’ म्हणून जगणे विसरून निराशेत जीवन व्यतीत करत होता. तो रुग्ण कुटुंब आणि समाज यांच्याप्रती असलेले त्याचे दायित्व विसरून गेला होता. त्याच्या या व्याधीची तीव्रता एवढी होती की, त्याला बांधून ठेवावे लागत होते.
३. तिसरा रुग्ण स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजत असे. ‘माझ्यामुळेच सर्व राजकारण चालत आहे’, अशा भ्रमात तो रहात असे. त्याला दिवस आणि रात्र यांचे भान रहात नव्हते. तो मनोराज्यात रमून मोठ्या आवाजात सतत बडबड करत असे. तो अती प्रमाणात जेवत असे. तो रात्री, अपरात्री दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाण्यात रमत असे. या गोष्टींचा त्याचे कुटुंबीय आणि शेजारी यांना पुष्कळ त्रास होत होता. त्या रुग्णाला त्याची जाणीव नव्हती आणि त्याला जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, तरीही तो ऐकण्याच्या स्थितीत नसायचा. जीवनातील प्रसंगांना सामोरे जाता न आल्याने त्याला तंबाखू आणि गुटखा यांचे अती प्रमाणात व्यसन लागले होते.
‘व्यसनाधीनता’ हा व्यक्तीतील तीव्र स्वभावदोष आणि अहं यांचाच परिणाम आहे’, हे माझ्या लक्षात आले, तसेच ‘षड्रिपू किती घातक आहेत !’, याची कल्पना वरील उदाहरणांवरून माझ्या लक्षात आली.
१ आ. रुग्णांच्या व्याधींविषयी आधुनिक वैद्यांशी चर्चा करतांना लक्षात आलेली सूत्रे
१. रुग्णालयात भरती झालेल्या रुग्णांच्या वर्तमान स्थितीबद्दल मी त्या रुग्णालयातील प्रमुख आधुनिक वैद्यांशी बोलले. तेव्हा मला समजले, ‘मनोरुग्णाच्या मुख्य २ मानसिक अवस्था असतात. एक मानसिक अवस्था, म्हणजे प्रचंड नकारात्मकतेतून आलेली निराशा किंवा निष्क्रियता, ज्याची परिणती कधी कधी रुग्णांनी आत्महत्या करण्यात होते.
२. दुसरी मानसिक अवस्था, म्हणजे रुग्णांनी वास्तवापेक्षा स्वतःला अत्यंत श्रेष्ठ समजणे. या रुग्णांमध्ये कृती पुष्कळ भरभर करणे आणि स्वतःला पुष्कळ मोठे समजून दुसर्याला तुच्छ लेखणे इत्यादी लक्षणे आढळतात.
३. त्या दोन्ही स्थितीत रुग्ण हिंसक बनून स्वतःला किंवा इतरांना हानी पोचवू शकतो. असा मनोरुग्ण माणूस म्हणून साधारण जीवन स्वतः जगू शकत नाही आणि इतरांनाही जगू देऊ शकत नाही. असा त्याचा गंभीर परिणाम होतो.
१ इ. रुग्णांच्या उपचारांवर होणारा आर्थिक व्यय : या मानसिक विकारातून बरे होण्यासाठी रुग्णाला रुग्णालयात न्यूनतम ८ ते १० दिवस आणि जास्तीत जास्त १ मास भरती व्हावे लागते. त्यासाठी त्याला ३ ते ५ सहस्र रुपये इतका व्यय करावा लागतो. त्या व्यतिरिक्त त्याच्या समवेत रहाणार्या नातेवाइकांचा व्यय आणि त्यांना सोसावा लागणारा मनस्ताप वेगळाच ! एवढे करूनही रुग्ण ६० टक्के इतकाच बरे होण्याची शक्यता असते. रुग्णाला रुग्णालयातून ज्या गोळ्या दिल्या जातात, त्या रुग्णाने नियमित घ्यायच्या असतात. रुग्णाने त्या गोळ्या घेणे बंद केले की, पुन्हा त्याचे मानसिक संतुलन बिघडू शकते, अशी स्थिती असते.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या ‘गुरुकृपायोगानुसार साधनेचे’ लक्षात आलेले महत्त्व !
अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया सांगितली आहे. मनुष्यात स्वभावदोष आणि अहं यांची तीव्रता वाढल्यास त्याची वर लिहिलेल्या मनोरुग्णांप्रमाणे स्थिती होऊ शकते. बहुतेकांना अल्प-अधिक प्रमाणात मानसिक त्रास असतो. ‘व्यक्तीचे प्रारब्ध किंवा अनिष्ट शक्तींचा त्रास’ यांमुळेही तिची मनोरुग्णासारखी स्थिती होऊ शकते. असे असले, तरीही व्यक्तीमध्ये १० टक्के स्वभावदोष असेल, तर वाईट शक्तींना तिच्यावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते.
आ. या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपण गुरुकृपायोगानुसार साधना करत आहोत. ती अतिशय अमूल्य असूनही विनामूल्य आहे.
इ. गुरुकृपायोगानुसार साधनेची ८ अंगे (टीप२) असून प्रथम प्राधान्य स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेला आहे; कारण आताच्या आपत्काळात स्वभावदोष आणि अहं यांच्या तीव्रतेमुळे मनुष्याला जगणे अतिशय कठीण झाले आहे. स्वतःतील स्वभावदोष दूर करण्याचे प्रयत्न करत असतांना त्याला भावाच्या स्तरावर प्रयत्न करणे आणि सत्सेवा यांची जोड दिल्यास मनुष्य भवसागरातून पार होऊ शकतो.
(टीप २ : अष्टांग साधना- १. स्वभावदोष निर्मूलन आणि गुण संवर्धन २. अहं निर्मूलन ३. नामजप ४. भावजागृतीसाठी करायचे प्रयत्न ५. सत्संग ६. सत्सेवा ७. सत्साठी त्याग आणि ८. प्रीती (इतरांविषयी निरपेक्ष प्रेम)
‘अशी विलक्षण आणि अनेक युगांत दुर्मिळ अशी साधना गुरुदेव आपल्याकडून करून घेत आहेत’, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे आहेत. मी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे. (७.३.२०२६)
शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
पू. शिवाजी वटकर (सनातनचे १०२ वे संत, वय ७९ वर्षे) आणि श्री. तुकाराम लोंढे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६० वर्षे) यांनी अनुभवलेली प्राणदाते सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !
वाढत्या मानसिक ताणामुळे ३ वर्षांत देशातील ४३८ सैनिकांच्या आत्महत्या !