मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलो नाही ! – प्रताप सरनाईक, आमदार, शिवसेना

आमदार प्रताप सरनाईक

मुंबई – मी कोणत्याही आर्थिक गुन्ह्यात अडकलो नाही. जो अडकलेला नसतो तोच विरोधकांना ठामपणे उत्तर देत असतो. भविष्यात असे अजून प्रसंग आले, तरी सामोरे जाण्याची सिद्धता आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. सरनाईक यांचे घर आणि कार्यालय यांवर २४ नोव्हेंबर या दिवशी अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकली होती. ‘टॉप्स’ आस्थापन समुहाच्या विरोधातील आर्थिक गैरव्यवहाराच्या गुन्ह्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.