अमेरिकेतील विश्‍वविद्यालयामध्ये जैन धर्माचे शिक्षण देण्यात येणार

अध्ययन पिठाची स्थापना

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील कॅलिफोर्निया विश्‍वविद्यालयाने ३ भारतीय वंशांच्या दांपत्यांकडून १० लाख डॉलरची देणगी मिळाल्यानंतर जैन धर्माचे शिक्षण देणार्‍या एका अध्ययन पिठाची स्थापना केली आहे. ‘भगवान विमलनाथ एंडाउड चेयर इन जैन स्टडीज युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, सांता बार्बरा’ येथे हे अध्ययन पीठ स्थापन करण्यात आले आहे.

१. विश्‍वविद्यालयाकडून सांगण्यात आले आहे की, येथे जैन धर्माचे सिद्धांत अहिंसा, अपरिग्रह आणि अनेकतावाद याविषयी शिक्षण देण्यात येईल. तसेच आधुनिक समाजामध्ये याचे अनुकरण करण्याकडे लक्ष देण्यात येईल.

२. डॉ. मीरा आणि डॉ. जसवंत मोदी यांच्या ‘वर्धमान चॅरिटेबल फाऊंडेशन’, रीता आणि डॉ. नरेंद्र पारसन यांच्या ‘नरेंद्र अँड रीता पारसन फॅमिली ट्रस्ट’ आणि रक्षा अन् हर्षद शहा यांनी त्यांच्या ‘शहा फॅमिली फाऊंडेशन’च्या माध्यमांतून दान केले आहे.