गोव्यात कोरोनामुळे केवळ १ मृत्यू, तर १२५ नवीन कोरोनाबाधित

पणजी – गोव्यात गेल्या २४ घंट्यांत कोरोनामुळे केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात १ सहस्र २२० चाचण्या करण्यात आल्या, त्यात नवीन १२५ कोरोनाबाधित आढळले आहेत. दिवसभरात २८५ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेणार्‍यांची संख्या १ सहस्र्र ४२४ झाली आहे. आतापर्यंतचे एकूण कोरोनाबाधित आणि बरे झालेले रुग्ण यांचे प्रमाण ९५.४६ टक्के आहे.