नावीन्यपूर्ण आध्यात्मिक संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘हिंदु धर्मात सांजवेळी देवापुढे दिवा लावून शुभंकरोति, श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र म्हणण्याची परंपरा आहे. सध्याच्या वैज्ञानिक युगातही ही परंपरा टिकून आहे. देवापुढे तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावतात. ‘तेलाचा दिवा किंवा तुपाचा दिवा लावल्याने वातावरणावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ८.४.२०२० या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करून त्यांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली.
टीप – तेलाच्या दिव्यात तिळाचे तेल आणि तुपाच्या दिव्यात गायीचे शुद्ध तूप घातले होते. चाचणीतील दोन्ही दिवे पितळ्याचे असून त्यांमध्ये हाताने वळलेली कापसाची वात घालून ते प्रज्वलित करण्यात आले.
१ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विश्लेषण – तेलाच्या दिव्याच्या तुलनेत तुपाच्या दिव्यामध्ये पुष्कळ अधिक सकारात्मक ऊर्जा असणे : हे पुढे दिलेल्या सारणीतून लक्षात येते.
२. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
२ अ. तेलाच्या दिव्याच्या तुलनेत तुपाच्या दिव्यातून पुष्कळ अधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होण्यामागील कारण : सर्वसाधारणतः तेलाच्या दिव्यातून रजोगुणी लहरींचे प्रक्षेपण होते; परंतु तिळाच्या तेलाच्या दिव्यातून काही प्रमाणात सत्त्व लहरींचे प्रक्षेपण होते. म्हणून इतर तेलांच्या तुलनेत तिळाच्या तेलाचा दिवा जास्त सात्त्विक असतो. कोणत्याही तेलापेक्षा तुपाचा (गायीच्या शुद्ध तुपाचा) दिवा सर्वांत सात्त्विक आहे; कारण तुपामध्ये देवतेच्या सात्त्विक लहरी आकृष्ट करून घेण्याची आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता जास्त आहे. त्यामुळे चाचणीतील तेलाच्या दिव्याच्या तुलनेत तुपाच्या दिव्यातून पुष्कळ अधिक सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित झाली.
२ आ. तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा यांतील भेद अन् तेलाच्या दिव्यापेक्षा तुपाचा दिवा लावणे का महत्त्वाचे ? : ‘पुढील सारणीत दिलेल्या तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा यांतील भेदावरून ‘तेलापेक्षा तुपाचा दिवा लावणे का महत्त्वाचे आहे ?’, हे लक्षात येते.
टीप – ‘सगुण-निर्गुण’ म्हणजे जास्त प्रमाणात सगुण आणि थोड्या प्रमाणात निर्गुण’
(संदर्भ : सनातनचा लघुग्रंथ ‘देवघर आणि पूजेतील उपकरणे’)
थोडक्यात, ‘तेलाच्या दिव्यापेक्षा तुपाचा दिवा लावणे आध्यात्मिकदृष्ट्या अधिक लाभदायी आहे’, हे या वैज्ञानिक चाचणीतून लक्षात येते. देवापुढे प्रतिदिन तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल, तर किमान सणासुदीच्या दिवशी तरी तुपाचा दिवा लावू शकतो आणि अन्य दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकतो.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (९.४.२०२०)
ई-मेल : [email protected]