‘सनबर्न’च्या पार्श्वभूमीची चौकशी करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे निर्देश !
(टीप : ‘म्युझिक कॉन्सर्ट’ म्हणजे पाश्चात्त्य संगीताचा कार्यक्रम)

मुंबई, २५ जून (वार्ता.) – गोरेगाव आणि वरळी येथील ‘म्युझिक कॉन्सर्ट’मध्ये तरुणांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर राज्य सरकारने आता कठोर पावले उचलली आहेत. राज्यात यापुढे कोणत्याही ‘म्युझिक कॉन्सर्ट’ना दारूची अनुमती दिली जाणार नाही, असा निर्णय गृह विभागाने घेतला असल्याचे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. यासमवेतच वादग्रस्त ‘सनबर्न फेस्टिव्हल’ची संपूर्ण माहिती आणि त्यांची आजवरची पार्श्वभूमी पडताळण्याचे निर्देशही त्यांनी अधिकार्यांना दिले आहेत.
‘नशा मुक्ती अभियाना’चे श्री. सतीश सोनार यांनी नुकतीच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा केली आणि दोषींवर कारवाईची मागणी केली. या भेटीदरम्यान गृहराज्यमंत्र्यांनी सरकारच्या नव्या धोरणाची माहिती दिली.
Mumbai: No permission for alcohol at music concerts hereafter: MoS Home Yogesh Kadam.
The Home Department has also ordered an inquiry into the background of Sunburn after demands for a permanent ban, citing concerns over drug abuse among youth.
If the Government truly follows a… pic.twitter.com/NkZusk8GEX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 27, 2026
उत्पादन शुल्क विभागाच्या जुन्या अनुमतींना चाप; नियम होणार कठोर
यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अशा संगीत महोत्सवांना मद्यविक्रीची अनुमती दिली जात होती, ज्यातून अनुचित प्रकार घडत होते; मात्र आता यापुढे नियम अधिक कठोर करण्यात आले असून अशा कोणत्याही कॉन्सर्टमध्ये दारूला अनुमती दिली जाणार नाही, असे गृहराज्यमंत्री कदम यांनी स्पष्ट केले.
केवळ नियम नकोत, कायमची बंदी घाला ! – नशा मुक्ती अभियान
गृहराज्यमंत्र्यांनी नियम कठोर करण्याचे आश्वासन दिले असले , तरी नशा मुक्ती अभियानाचे श्री. सतीश सोनार यांनी यावर असमाधान व्यक्त केले. गोरेगाव येथील नेस्को आणि वरळीच्या एन्.एस्.सी.आय. डोममध्ये नुकत्याच झालेल्या तरुणांच्या मृत्यूचा संदर्भ देत श्री. सोनार गृहराज्यमंत्र्यांना म्हणाले, ‘‘केवळ नियम कठोर करून चालणार नाही. गोव्यापासून ते मुंबईपर्यंत तरुणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या ‘सनबर्न’चा इतिहास अत्यंत काळाकुट्ट आहे. पैशांच्या जोरावर तरुणाईला व्यसनाच्या गर्तेत ढकलणार्या या फेस्टिव्हलवर महाराष्ट्रात कायमची बंदीच घातली पाहिजे.’’
पोलीस महासंचालक आणि अधिकारी यांना चौकशीचे निर्देश !श्री. सतीश सोनार यांच्या यामागणीची नोंद घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणी तातडीने पावले उचलली. त्यांनी पोलीस महासंचालकांना चौकशी करू कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच उपस्थित गृह विभागाच्या अधिकार्यांना ‘सनबर्न’च्या आयोजकांविषयी, त्यांच्या आतापर्यंतच्या कार्यक्रमांविषयी आणि त्यांच्या पार्श्वभूमीविषयी अधिक सविस्तर माहिती गोळा करण्याचा आदेश दिला आहे. |
कचरा प्रकल्पाच्या निविदेचे शुल्क अल्प करण्याची महापालिका आयुक्तांची चेतावणी !
जोगेश्वरीमध्ये ११ लाख रुपयांचा विनालेबल साबण जप्त !
महाराष्ट्र विधीमंडळ स्वीकारणार केंद्रशासनाने विकसित केलेली ‘एकात्मिक डिजिटल प्रणाली’ !
Supreme Court Bengal SIR : मतदार सूचीमध्ये नाव नसल्याने नागरिकत्व संपुष्टात येत नाही !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !