बलात्कार आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ यांविषयीचे मूलभूत प्रश्‍न

‘लग्नाचे आमीष दाखवून बलात्कार केला’, अशी तक्रार आज-काल महिला बलात्कारासंबंधी करतात. वास्तविक यामध्ये मूलभूत विचार असा करायला पाहिजे की, त्या मुलीने स्वतःहून लग्नाची सिद्धता केली होती का ? आणि ती सिद्धता तिने केली असल्यास लग्न होईपर्यंत थांबणे अपरिहार्यच होते. लग्न झालेच आहे, असे समजून शारीरिक संबंध ठेवणे, हे चुकीचेच आहे. त्यामुळे काही कारणाने नवरा-बायकोचे लग्न व्हायच्या आधी असे संबंध कितपत ग्राह्य धरणे, हे ठरवणे क्रमप्राप्त आहे. याविषयी अनेक वर्षे आणि अनेक मास (महिने) गेल्यानंतर तक्रार का केली जाते ? आणि ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये एकमेकांवर विश्‍वास ठेवून अनेक गोष्टी केल्या जातात. त्यानंतर अविश्‍वास होतो. मग त्यासाठी काय करायचे ? अशी सहस्रो प्रकरणे आहेत. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा प्रश्‍नही पुढे बलात्काराचा होतो का ?, हाही मोठा प्रश्‍न आहे. तेव्हा एकूणच ठराविक वयातील शारिरीक आकर्षण यास बळी पडून काही घटना झाल्या असल्यास त्यातून पुढे हानी कुणाची होते ?, हे पहाणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून प्रत्येक मुलीने आपण लग्नाआधी काही गोष्टींपासून दूरच राहिले पाहिजे, हे ठरवले पाहिजे.’

(संदर्भ : ‘लोकजागर’, ८.३.२०१५)