
मानवी जीवनात आत्म कल्याणासाठी पाप-पुण्याचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्य कोणत्याही योनीत पाप म्हणजे काय ? आणि पुण्य म्हणजे काय ? हे कळतसुद्धा नाही. एक मनुष्यजन्मच असा आहे की, ज्यात पापाने विनाश आणि पुण्याने कल्याण, हे माणसाच्या लक्षात येऊ शकते. आता पाप आणि पुण्य यांची सोपी व्याख्या अशी की, जे देवाला आवडत नाही, ते कर्म म्हणजे पाप आणि जे देवाला आवडते, ते कर्म म्हणजे पुण्य; पण देवाला काय आवडते आणि काय आवडत नाही ? ते आपल्याला कसे कळावे ? त्यासाठी देवानेच ते कळायची योजना मानवाच्या बुद्धीमध्ये करून ठेवली आहे. आपली प्रत्येक कृती देवाला आवडेल कि नाही, हे त्याला मुळी आतूनच कळते. अशा वेळी देवाला न आवडणारी गोष्ट कटाक्षाने टाळावी. परद्रव्याकडे, परस्त्रीकडे स्वार्थी आणि दुष्टबुद्धीने बघणे, हे पाप आहे, याची सूचना आपल्याला आतूनच कळते. याउलट जे करणे चांगले आहे ते आपण करायला हवे, अशी सूचनाही आपल्याला आतूनच मिळते. केवळ एवढेच की, देवाला आवडणारे प्रत्येक कर्म, म्हणजे पुण्य असेलच असे नाही; कारण आपण आपले कर्तव्य केले पाहिजे ते देवाला आवडते; पण कर्तव्य हे कर्तव्यच (करणे आवश्यक असे) असल्यामुळे ते पुण्य नाही, तर कर्तव्य आहे. म्हणून त्याला पुण्याचे विशेष फळ नाही. अशा प्रकारे पाप-पुण्याचा विचार करून मनुष्याने जीवन जगावे, हेच देवाला प्रिय असते. काही सत्कर्मे तीसुद्धा पाप ठरू शकतात, उदा. दोन माणसांची मारामारी चाललेली दिसली, तर आपण त्यात भाग घेऊन जो मार खात आहे, त्याला वाचवणे हे बाह्यतः सत्कर्म आहे; पण ज्याला मारले तो चोर वा गुन्हेगार किंवा एखाद्या महिलेशी दुष्कर्म करून पळून जात असेल, तर तशा माणसाला वाचवणे, हे सत्कर्म नव्हे. यावरून कर्माची गती किती गहन आहे, हे लक्षात येते.
– भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
जंतरमंतरवरील ‘नौटंकी’ : ‘वोक टूलकिट’चाच आविष्कार !
शरिराचा वरचा किंवा खालचा भाग येथे आलेली सूज न्यून करण्यासाठी करावयाचा सर्वसाधारण व्यायाम आणि त्याचा योग्य क्रम !
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !