(टीप : ‘वोक टूलकिट’ म्हणजे प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात कार्यरत यंत्रणा !)
नामवंत अर्थतज्ञ डॉ. क्रिस्टियन निमिट्झ (Dr. Kristian Niemietz) यांनी ‘सोशलिझम : द फेल्ड आयडिया दॅट नेव्हर डाईज’ हे महत्त्वपूर्ण पुस्तक लिहिले आहे. समाजवाद किंवा साम्यवाद या वामपंथी विचारधारा वारंवार पराभूत झाल्या आहेत आणि अयशस्वी ठरल्या आहेत. ही विचारधारा स्वीकारणार्या प्रत्येक देशाला अत्याचार आणि अराजक यांचाच सामना करावा लागला. समतेचे स्वप्न कितीही आकर्षक वाटले, तरी वास्तवात त्याचा अर्थ ‘गरिबीचे समान वाटप’ हाच ठरला.
या विचारसरणीविषयी लोकांचा वारंवार भ्रमनिरास झाल्यामुळे साम्यवाद्यांनी हे ओळखले की, यापुढे मार्क्सवाद किंवा समाजवाद या नावाने कुणीही आपल्या विचारांकडे आकर्षित होणार नाही. यासाठी त्यांनी त्यांच्या घातक आणि अराजकतावादी विचारांना सामाजिक न्याय, स्त्रीवाद, पर्यावरणवाद, सर्वसमावेशकता अन् बहुसांस्कृतिकता या आकर्षक नावांनी ‘रिपॅकेज’ (पुनर्संघटित) केले. हा होता मार्क्सवादाचा नवा अवतार ‘सांस्कृतिक मार्क्सवाद किंवा वोकिझम’. या नव्या ‘पॅकेजिंग’ला लोकांच्या गळी उतरवण्यासाठी त्यांनी नवी कार्यपद्धतही विकसित केली. या टूलकिट्स बरहुकूम ‘झुरळ (कॉकरोच) आंदोलन’ कसे चालू आहे, हे पाहिले की, जंतरमंतरवर नेमके काय आणि ते कशासाठी चालले, याची स्पष्ट कल्पना येते.
प्रसिद्ध लेखक : श्री. अभिजित जोग, पुणे.

१. साम्यवाद्यांची खेळी : जनतेच्या मनात भ्रम
संविधानिक मार्गाने निवडणुकांमध्ये विजय मिळवून आपण कधीही सत्ता मिळवू शकत नाही, हे ध्यानात आलेल्या साम्यवाद्यांनी ‘अल्टर्नेटिव्ह पॉलिटिक्स’ (पर्यायी राजकारण) ही संकल्पना विकसित केली आहे. यानुसार राजकीय पक्ष, निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्था या सगळ्या संविधानिक संस्थांवर लोकांचा तीळमात्रही विश्वास उरू नये, असे प्रयत्न केले जातात. त्यांच्या जागी ‘ॲक्टिव्हिस्ट्स’ (सामाजिक कार्यकर्ते) आणि ‘एन्.जी.ओ.’ (स्वयंसेवी संस्था) यांची प्रतिष्ठापना केली जाते. ‘हेच आपले भाग्यविधाते आहेत’, असा भ्रम जनतेच्या मनात निर्माण केला जातो. यासाठी काही व्यक्तींना हेरून त्यांना ‘मॅगेसेसे’सारखे पुरस्कार देऊन त्यांचे महिमामंडन केले जाते. केजरीवाल यांची अशीच प्रतिमा निर्मिती करण्यात आली. आता त्यांनी राजकीय पक्षच काढल्यामुळे त्यांच्याच तालमीत सिद्ध झालेल्या दीपकेला पुढे करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत दीपकेला ‘मॅगेसेसे’ पुरस्कार किंवा वांगचुकला ‘नोबेल’ पुरस्कार मिळाला, तर आश्चर्य वाटून घेऊ नका !

‘नाम रहेगा अल्ला का’ असली गाणी, ‘मेरा जेंडर मेरी मर्जी’ (माझे लिंग माझी इच्छा), ‘उमर खालीद, शरजील इमाम झिंदाबाद’ असल्या घोषणा दिल्या जाऊ लागल्या.
‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटणे, धर्मेंद्र प्रधान यांचे त्यागपत्र मागणे, विद्यार्थ्यांचे भवितव्य यांविषयी आंदोलनकर्त्यांना काहीही देणे-घेणे नसून त्याच्या आडून ‘इस्लामो-लेफ्टिस्ट वोक अजेंडा’ (इस्लामी-साम्यवादी जे प्रस्थापित व्यवस्थेविरोधात कार्यसूचीप्रमाणे कार्य करतात), हाच त्यांचा खरा उद्देश आहे, हे स्पष्ट झाले (आणि याला वांगचुकने विरोध केल्याचेही दिसले नाही).
– श्री. अभिजित जोग

२. साम्यवाद्यांचा अराजक पसरवण्याचा ‘अजेंडा’ उघड !
‘वोक टूलकिट’चा आणखी एक पैलू, म्हणजे ज्यांच्याविषयी सहज सहानुभूती निर्माण होईल, अशा गटांना पुढे करून त्यांच्या आडून स्वतःचा घातक आणि अराजकतावादी ‘अजेंडा’ (कार्यसूची) पुढे रेटायचा. यासाठी शेतकरी, वृद्ध महिला, लहान मुले आणि विद्यार्थी यांच्या गटांना पुढे करून आंदोलने कशी केली जातात, याचा अनुभव देशाने मोदी सरकारच्या काळात वारंवार घेतला आहे. या वेळी ‘नीट’ची (राष्ट्रीय पात्रता परीक्षेची) प्रश्नपत्रिका उघड झाल्यामुळे विद्यार्थ्यांना खरोखरच कमालीची गैरसोय आणि मनस्ताप सहन करावा लागला. या विद्यार्थ्यांविषयी देशात असलेल्या सहानुभूतीचा लाभ घेऊन मोठे अराजक निर्माण करता येईल, या आशेने ‘कॉकरोच जनता पक्षा’चे आंदोलन मोठा गाजावाजा करून चालू करण्यात आले; पण या आंदोलनाला फारसा जनाधार लाभला नाही. त्यात सरकारने ‘नीट’ परीक्षा पुन्हा घेतली, जी निर्विघ्नपणे पार पडून ११ लाख २१ सहस्र विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावर्षी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध असलेल्या जागांची संख्या १ लाख ३७ सहस्र इतकी आहे, जी वर्ष २०१४ मधील ५१ सहस्र जागांच्या तुलनेत तब्बल १६६.७ टक्के इतकी अधिक आहे. अशा प्रकारे उरलासुरला प्रतिसादही संपल्यामुळे ‘विद्यार्थ्यांवरील अन्यायाला विरोध’ हा मुखवटा गळून पडला आणि साम्यवाद्यांचा खरा ‘अजेंडा’ उघडा पडला.
सोनम वांगचुक यांच्याविषयी पसरवण्यात आलेले कथानक आणि प्रत्यक्षातील वास्तव

या ‘ॲक्टिव्हिस्ट’ (सामाजिक कार्यकर्ते) लोकांच्या प्रतिमेला बळ देण्यासाठी नैतिक अधिष्ठान असलेल्या एखाद्या व्यक्तीचे साहाय्य घेतले जाते. केजरीवालच्या ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’ या मोहिमेला बळ देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या स्वच्छ, चारित्र्यवान प्रतिमेचा पुरेपूर वापर करून घेण्यात आला. या वेळी हे स्थान सोनम वांगचुकला देण्याचा प्रयत्न होत आहे; पण ही निवड मात्र पूर्णपणे फसली आहे; कारण वांगचुकच्या विश्वासार्हतेविषयी मोठीच प्रश्नचिन्हे आहेत.
वांगचुकच्या स्वयंसेवी संस्थांमध्ये घोटाळे आढळल्याने केंद्र सरकारकडून कारवाईवर्ष २०२३ मध्ये वांगचुकने त्याच्या पत्नीसह शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेऊन शिक्षणक्षेत्रात त्यांच्या नेतृत्वाखाली होणार्या पालटांचे तोंड भरून कौतुक केले होते; पण वर्ष २०२५ मध्ये सरकारने त्याच्या ‘सेकमोल’ (स्टुडंट्स एज्युकेशनल अँड कल्चरल मुव्हमेंट ऑफ लडाख) आणि ‘हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव्ह लर्निंग’ (एच्.आ. य.ए.एल्.) या दोन स्वयंसेवी संस्थांच्या हिशोबात घोटाळे आढळल्यामुळे त्यांचे ‘एफ्.सी.आर्.ए.’ (विदेशी योगदान (नियमन) कायदा) परवाना रहित केला. यामुळे विदेशी निधीचा ओघ आटला आणि अचानक वांगचुकला मोदी सरकार ‘फॅसिस्ट’ (हुकूमशाही) आणि पर्यावरणविरोधी असल्याचा साक्षात्कार झाला. – श्री. अभिजित जोग |
अभिनेते आमिर खानने स्पष्ट केले आहे, ‘त्याच्या ‘थ्री इडियट्स’मधील फुन्सुक वांगडू या भूमिकेचा सोनम वांगचुकशी काहीही संबंध नाही. या चित्रपटाची निर्मिती झाली, त्या वेळी त्यांनी वांगचुकचे नावही ऐकले नव्हते.’ याचा अर्थ वांगचुकच्या प्रतिमा निर्मितीसाठी ‘वोक लॉबी’ने (प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात कार्यरत टोळीने) या चित्रपटाचा चलाखीने वापर करून घेतला. चित्रपटात वांगडू हा गरिबीतून वर आलेला प्रतिभावान ‘इनोव्हेटर’ (नवोदित) असल्याचे आणि त्याच्या नावावर अनेक ‘पेटंट’ (सरकारकडून संशोधकाला दिला जाणारा एकस्व विशेषाधिकार) असल्याचे दाखवले आहे. हे सगळे वांगचुकच्या नावावर खपवण्यात आले. वास्तविक वांगचुकची पार्श्वभूमी गरिबीची नव्हे, तर ‘एलीट’ (उच्चभ्रू) आणि ‘प्रिव्हिलेज्ड’ (विशेषाधिकार असलेला) आहे. त्याचे वडील काँग्रेसचे सभासद आणि फारुख अब्दुल्लांच्या सरकारमध्ये मंत्री होते, तसेच त्याच्या नावावर कुठलीही ‘पेटंट्स’ नाहीत. ‘वोक’ प्रसिद्धीच्या यंत्रणेने अशीही थाप मारली आहे की, लडाखमध्ये काही क्षेत्रांत ठराविक काळासाठी निर्माण होणारी पाण्याची समस्या सोडवण्यासाठी वांगचुकने मानवनिर्मित हिमनद्यांची संकल्पना विकसित केली. वास्तविक ही कल्पना लडाखमधील चेवांग नॉर्केल या कल्पक अभियंत्याने प्रत्यक्षात आणली आहे.
वांगचुक शास्त्रज्ञ आणि ‘इनोव्हेटर’ असल्याचा दावा जसा पोकळ आहे, तसेच त्याच्याभोवती निर्माण करण्यात आलेले नैतिकतेचे वलयही बेगडी आहे. वर्ष २००७ मध्ये तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या (‘यूपीए’च्या) काळात लेहच्या जिल्हा न्यायाधिशांनी वांगचुकवर ‘सरकारी भूमी बळकावणे, परदेशातून येणार्या निधीचा गैरवापर करणे, चीनशी हातमिळवणी करून देशविरोधी कारवाया करणे’, असे आरोप ठेवून नोटीस बजावली होती.
– श्री. अभिजित जोग (१८.७.२०२६)
३. आंदोलनातील हिंदुविरोधी अजेंडा उघड
‘काश्मीर हा भारताचा भाग कधीच नव्हता आणि नाही’, हे बरळणार्या अरुंधती रॉय, कसाबसाठी दयेचा अर्ज प्रविष्ट करणारे कॉलिन गोन्साल्विस, याकूब अब्दुल रझाकसाठी मध्यरात्री सर्वाेच्च न्यायालयाचे दरवाजे उघडायला लावणारे प्रशांत भूषण, प्रभु श्रीरामाची कुचेष्टा करणारा कुणाल कामरा असले लोक जंतरमंतरवरील विचारमंचावर झळकू लागले.
अशा प्रकारे बारगळलेल्या आंदोलनात जीव ओतण्याचा केविलवाणा प्रयत्न म्हणून वांगचुकना उपोषणाला बसवण्यात आले. विद्यार्थ्यांविषयीची सहानुभूतीही आंदोलनाला बळ देत नाही म्हटल्यावर ‘पर्यावरणवादी शास्त्रज्ञाने’ स्वतःचा जीव पणाला लावला आहे, असे वातावरण निर्माण करून या आंदोलनाला पाठिंबा न देणे, ही असंवेदनशीलता असल्याची अपराधीत्वाची भावना लादण्याचा प्रयत्न केला जात आहे.
४. वांगचुक प्रकरणात ‘वोक टूलकिट’चा हातखंडा खेळ
नैतिकतेची अशी रेघ आखायची की, तिच्या योग्य बाजूला असण्यासाठी वोक विचारांना पाठिंबा देणे अपरिहार्यच ठरते. अन्यथा तुम्ही वैचारिक विरोधकच नाही, तर एक ‘वाईट’, असंवेदनशील, ‘फॅसिस्ट’ व्यक्ती आहात, असे दडपण निर्माण करून विरोधकांना ‘डीह्युमनाईझ’ (अमानुषीकरण) केले जाते. हा ‘वोक टूलकिट’चा हातखंडा खेळ आहे. तोच या प्रकरणात आता खेळला जात आहे.
या खेळाला भुलण्याची काहीच आवश्यकता नाही; कारण विद्यार्थ्यांच्या हिताचा या आंदोलनाशी काहीही संबंध नाही, तसेच वांगचुकवर ‘फॅसिस्ट’ मोदी सरकारने नव्हे, तर ‘लोकशाहीवादी’ यूपीए सरकारने भ्रष्टाचार आणि देशविरोधी कारवायांचे ठोस आरोप केलेले असल्यामुळे सरकारवर नैतिक दडपण आणण्याचे कुठलेही अधिष्ठान त्याच्याकडे नाही. लडाखमध्ये हिंसक दंगली भडकवून ४ तरुणांच्या मृत्यूसाठी उत्तरदायी असलेल्या या व्यक्तीच्या आमिषांना फसून सरकारने काही निर्णय घ्यावा, ही अपेक्षा चुकीची आहे.
शिक्षण क्षेत्रात सकारात्मक पालट घडवणे अत्यावश्यक आहे, हे खरेच आहे; पण त्यासाठी अराजकतावादी आंदोलन चालू करण्याचा आटापिटा करण्यापेक्षा सकारात्मक चर्चा आणि विचारमंथन आवश्यक आहे. त्यासाठी हेतू आणि नियत साफ असलेल्या तज्ञांशी सरकारने नक्की संवाद चालू करावा. पंतप्रधानांना शिवीगाळ करणे, हिंदु श्रद्धांची कुचेष्टा करणे, काश्मीरला भारतापासून तोडण्याची भाषा करणे, ‘भारताचा नेपाळ करू’, अशा धमक्या देणे, ‘नाम रहेगा अल्ला का’ अशा गर्जना करणे… याचा विद्यार्थ्यांचे हित वा शिक्षण क्षेत्रातील सकारात्मक पालट यांच्याशी काहीही संबंध नाही.
न्यायालयाच्या आदेशानुसार वांगचुकला रुग्णालयात भरती करून सरकारने ही नौटंकी (नाटक) थांबवली, हे योग्यच झाले.
– श्री. अभिजित जोग, प्रसिद्ध लेखक, पुणे.
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलनाचा ‘अजेंडा’ हाच आहे का ?‘कॉकरोच जनता पक्षा’च्या निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या काही व्यक्तींमध्ये यांचा समावेश आहे – १. अरुंधती रॉय : ज्यांचा असा विश्वास आहे की, काश्मीर हा भारताचा भाग नाही. २. कॉलिन गोन्साल्विस : ज्यांनी २६ नोव्हेंबर २००८ या आक्रमणाचा आतंकवादी अजमल कसाब याच्यासाठी दयेची याचिका प्रविष्ट केली होती. ३. अधिवक्ता प्रशांत भूषण : ज्यांनी आतंकवादी याकूब रझाकची फाशी रोखण्यासाठी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. ४. नंदिता नारायण : ज्यांनी ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या विचारमंचावरून पाकिस्तानी कवी फैज अहमद फैज यांची ‘बस नाम रहेगा अल्लाह का’ (केवळ अल्लाचेच नाव राहील), ही कविता म्हणून दाखवली. ५. कुणाल कामरा : ज्याने ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या मंचावरून टिप्पणी केली, ‘हे लोक ‘सीते’च्या पतीचे काम करत असतांना ‘नीता’च्या पतीचे नाव घेतात.’ हे सर्व पाहून हे ‘नीट’ (राष्ट्रीय पात्रता परीक्षा)च्या प्रश्नपत्रिका फुटीविरुद्धचे आंदोलन वाटते का ? जर ‘नीट’च्या विद्यार्थ्यांसाठी न्याय मिळवणे, हा खरा उद्देश असता, तर प्रश्नपत्रिका फुटीचा फटका बसलेल्या विद्यार्थ्यांना किंवा ज्यांचे पाल्य या घटनेमुळे दगावले, त्या पालकांना मंचावर संधी द्यायला हवी होती. त्याऐवजी हा विचारमंच ‘इस्लामो-लेफ्ट’ (इस्लामी-साम्यवादी) विचारसरणीच्या गटाच्या हवाली करण्यात आला. यावरून ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या निदर्शनांच्या आयोजकांचे प्राधान्यक्रम आणि या आंदोलनामागील खरा ‘अजेंडा’ (भूमिका) स्पष्ट होतो. आंदोलनाचा वापर राजकीय किंवा वैचारिक अजेंड्याला पुढे नेण्यासाठी केला जात आहे का ? सोनम वांगचुक यांनीही त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे, याकडे बारकाईने पाहिले पाहिजे. त्यांना केवळ एका प्याद्यासारखे वापरले जात आहे, तर इतर लोक त्यांच्या विश्वासार्हतेचा आणि जनमानसातील प्रतिमेचा वापर करून या आंदोलनाला वैधता मिळवून देत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वतः सोनम वांगचुक यांनी ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या मंचावरून सांगितले होते, ‘जेव्हा ते उपोषणावर होते, तेव्हा आंदोलनातील इतर लोक मात्र जेवण करत होते.’ त्यांनी उघडपणे स्वतःची निराशा व्यक्त करतांना म्हटले होते, ‘जर तुम्ही माझ्यासह बेमुदत उपोषणात सहभागी होऊ शकत नसाल, तर किमान एक दिवसाचा उपवास करा किंवा पाठिंबा दर्शवण्यासाठी एक वेळचे जेवण तरी टाळा.’ ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या निदर्शनांच्या किती आयोजकांनी त्यांच्या या आवाहनाला खरोखर प्रतिसाद दिला ? त्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे की, लोकांच्या दृष्टीने ज्या उद्देशासाठी हे आंदोलन चालले आहे, त्याऐवजी याचा वापर एखाद्या मोठ्या राजकीय किंवा वैचारिक अजेंड्याला पुढे नेण्यासाठी केला जात आहे का ? कारण असे दिसते की, ‘कॉकरोच’चे आंदोलन ‘नीट’ प्रश्नपत्रिका फुटीचा विषय सोडून इतर सर्व सूत्रांसाठीचे विचारमंच बनले आहे. (हेमंत कुंभार यांच्या फेसबुकवरून साभार) |
सनातन संस्थेच्या श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा छत्तीसगड राज्याचा दैवी दौरा !
छत्तीसगडमधील धर्मकार्याला आध्यात्मिक दिशा देणारा सद्गुरुद्वयींचा दौरा !
पाप-पुण्य
शरिराचा वरचा किंवा खालचा भाग येथे आलेली सूज न्यून करण्यासाठी करावयाचा सर्वसाधारण व्यायाम आणि त्याचा योग्य क्रम !
अमेरिकेच्या भारतविरोधी कारवाया !
…अशा प्रकारे भारतीय विरांनी पाकिस्तानी जिहाद्यांना हाकलून लावले !