इराणच्या ९० सैनिकी आणि सागरी तळांना केले लक्ष्य
तेहरान (इराण) – अमेरिका आणि इराण यांच्यातील ‘शांतता करार’ मोडला असून आखातात पुन्हा एकदा युद्धाला तोंड फुटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी संपल्याची घोषणा केल्यानंतर ९ जुलैला पहाटे अमेरिकेने इराणच्या दक्षिण-पूर्व भागातील मोक्याच्या चाबहार बंदरावर क्षेपणास्त्रांद्वारे जोरदार आक्रमण केले. दोन्ही देशांकडून सलग दुसर्या दिवशी एकमेकांवर आक्रमणे चालू असून यामुळे आखात पुन्हा युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.
इराणी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार चाबहार शहरात ९ जुलैला लागोपाठ अनेक भीषण स्फोट झाले. या आक्रमणांनंतर शहरातील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. आक्रमणानंतर स्थानिक आपत्कालीन सेवा आणि रुग्णवाहिका घटनास्थळी मार्गस्थ झाल्या आहेत.
इराणची शक्ती नष्ट करण्यासाठी आक्रमण ! – अमेरिका
अमेरिकेच्या सैन्याने दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने इराणच्या ९० सैनिकी आणि सागरी तळांना अचूक लक्ष्य करण्यात आले. हॉर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये आंतरराष्ट्र्रीय नौकांच्या वाहतुकीत अडथळा आणण्याची इराणची क्षमता नष्ट करण्यासाठी अमेरिकेने हे आक्रमण केले आहे. आंतरराष्ट्रीय जलमार्गावरून प्रवास करणार्या व्यापारी नौका आणि निष्पाप कर्मचारी यांच्यावर झालेल्या आक्रमणांना इराणच उत्तरदायी आहे.
वादाची ठिणगी कशी पडली?
७ जुलै या दिवशी हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून (२ जलाशयांना जोडणार्या जलमार्गातून) जाणार्या ३ व्यापारी नौकांवर अज्ञातांनी आक्रमण केले. या आक्रमणांमागे इराणचा हात असल्याचा थेट आरोप अमेरिकेने केला होता. याचा सूड म्हणून अमेरिकेने इराणवर सैन्य कारवाई केली आहे. यावर संतप्त झालेल्या इराणने कुवेत, बहरीन आदी देशांतील अमेरिकेच्या सैन्यतळांवर आक्रमणे केली. यावर आता ट्रम्प यांनी पुन्हा ‘इराणच्या आक्रमणाला २० आक्रमणे करून प्रत्युत्तर देऊ’, अशी चेतावणी दिली आहे.
भारताला बसणार फटका !सामरिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेले चाबहार बंदर विकसित आणि व्यवस्थापित करण्यासाठी भारताने इराणशी १० वर्षांचा करार केला आहे. जवळपास ४ सहस्र २०० कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे. चाबहार बंदराची मोठी हानी झाल्यास भारताला त्याचा मोठा फटका बसणार आहे. |

Bangladesh Temple Attack : बांगलादेशातील जुन्या श्री कालीमाता मंदिरावर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण
Minority Youth Skill Training : धर्मनिरपेक्ष भारतात केंद्रातील भाजप सरकारचे अल्पसंख्य धर्मियांच्या तरुणांसाठी कौशल्य प्रशिक्षण उपक्रम
PM Modi Australia Visit : ऑस्ट्रेलिया भारताला युरेनियम पुरवणार !
US Iran War : अमेरिकेच्या आक्रमणांना इराणचे जोरदार प्रत्युत्तर
Iran-America War : अमेरिकेकडून इराणच्या ८० हून अधिक सैन्य ठिकाणांवर आक्रमण
डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर आक्रमण केल्याने संताप व्यक्त