
सातारा, ९ जुलै (वार्ता.) – शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारा कास तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. गत आठवड्यात चालू झालेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे ७ जुलै या दिवशी तलाव भरला. यामुळे सातारावासियांची वर्षभरासाठीची पिण्याच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे.
विकास परिसरामध्ये अजूनही मुसळधार पाऊस चालूच आहे. कास तलावाची पाणी पातळी ६१.०४८ फुटांपर्यंत पोचल्यावर अतिरिक्त पाणी सांडव्यावरून वाहू लागले आहे. धरण भरल्यामुळे परिसरातील ओढे, नाले आणि झरे प्रवाहित झाले आहेत. कन्हेर आणि उरमोडी धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. भांबोली आणि एक्यू परिसरातील धबधबे जोरात वाहू लागले आहेत.
मोशी दुर्घटनेत अग्नीशमनदलाच्या कर्मचार्यांनी ९ जणांना वाचवले !
अटक केलेल्या भाऊसाहेब चव्हाण अधिकार्याला बडतर्फ करू !
अधिक मोबदल्याच्या हेतूने ‘रिंगरोड’साठी भूमी खरेदी झाल्याविषयी चौकशी होणार !
अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना सेवेत घेऊ ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ‘मिरर’ स्वरूपात छापले; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन !
जंजिरा गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याच्या मागणीसाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे मुंबईत तीव्र आंदोलन !