
पिंपरी-चिंचवड – येथील मोशी येथे कचरा डेपोजवळ ‘वेस्ट टू एनर्जी’ (टाकाऊपासून ऊर्जा निर्मिती) प्रकल्पाची इमारत ८ जुलैला कोसळली दुर्घटना घडली आहे. अतीवृष्टीमुळे कचर्याच्या डोंगराचे भूस्खलन होऊन तो थेट ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाच्या प्रशासकीय इमारतीवर कोसळला. या दुर्घटनेत ढिगार्याखाली अडकलेल्या ९ जणांना अग्नीशमनदलाच्या कर्मचार्यांनी सुखरूप बाहेर काढले. अनिल वाघ, पुंडलिक भुतापल्ले यांच्यासह इतर ३ सहकार्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालत ९ जणांना वाचवले. अजूनही काही जण ढिगार्याखाली आहेत. या कर्मचार्यांनी दाखवलेले हे शौर्य सध्या संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा विषय ठरत आहे.
कर्मचारी अनिल वाघ आणि त्यांच्या गटाने सलग १४ घंटे इमारतीच्या आत राहून बचावाची कामगिरी पार पडली. कोसळलेला स्लॅब आणि कचर्याच्या ढिगार्यामुळे श्वासोच्छ्वास घेण्यासाठी अजिबात प्राणवायू शिल्लक नव्हता. अत्यंत प्रतिकूल वातावरणातही अनिल वाघ आणि त्यांचे सहकारी मागे हटले नाहीत.
अटक केलेल्या भाऊसाहेब चव्हाण अधिकार्याला बडतर्फ करू !
अधिक मोबदल्याच्या हेतूने ‘रिंगरोड’साठी भूमी खरेदी झाल्याविषयी चौकशी होणार !
अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना सेवेत घेऊ ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ‘मिरर’ स्वरूपात छापले; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन !
जंजिरा गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याच्या मागणीसाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे मुंबईत तीव्र आंदोलन !
‘गोकुळ’च्या अपकीर्तीच्या विरोधात डॉ. युवराज येडुरे यांचे भर पावसात आत्मक्लेष आंदोलन !