‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ‘मिरर’ स्वरूपात छापले; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन !

देवेंद्र फडणवीस


मुंबई, ९ जुलै (वार्ता.) –
सरकारच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रसिद्ध केल्या जाणार्‍या एप्रिल २०२६ च्या ‘लोकराज्य’ मासिकातील एका लेखामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र ‘मिरर’ (आरशात दिसणार्‍या छायाचित्राप्रमाणे म्हणजे उजवी बाजू डावीकडे आणि डावीकडील बाजू उजवीकडे दिसणे) स्वरूपात छापून आले. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २४ घंट्यांमध्ये कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनी हा विषय स्थगन प्रस्तावाच्या अंतर्गत सभागृहात मांडण्याची अनुमती मागितली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व स्थगन प्रस्तावांना अनुमती नाकारली असल्याने याविषयी सभागृहाला अवगत करण्याची अनुमती दिली. नितीन राऊत यांनी हे सूत्र मांडल्यावर महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक होऊन सभागृहाच्या मोकळ्या जागेत आले. या वेळी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात येऊन कारवाईचे आश्वासन दिले.