सडेतोड प्रत्युत्तर देण्याची इराणची चेतावणी !

तेहरान (इराण) – अमेरिकेने युद्धविरामाचे उल्लंघन करत ८ जुलैच्या पहाटे इराणवर हवाई आक्रमण केले. अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड’च्या माहितीनुसार इराणच्या ८० हून अधिक सैन्य ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. ‘हे दोन्ही देशांमधील कराराचे उल्लंघन असून अमेरिकेला याचे सडेतोड उत्तर दिले जाईल’, अशी चेतावणी इराणी सैन्याने दिली आहे.
१. अमेरिकेचे म्हणणे आहे की, ही कारवाई हॉर्मुजच्या सामुद्रधुनीतून (२ जलाशयांना जोडणार्या जलमार्गातून) जाणार्या ३ नौकांवर झालेल्या आक्रमणांच्या प्रत्युत्तरात करण्यात आली. अमेरिकेने या आक्रमणासाठी इराणला उत्तरदायी धरले आहे.
२. हवाई आक्रमणात इराणची हवाई संरक्षण प्रणाली, ‘कमांड अँड कंट्रोल सेंटर’, किनारी रडार, भूमीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, अँटी-शिप क्षेपणास्त्र प्रणाली, ड्रोन लॉन्च साइट्स आणि ६० हून अधिक सैन्यनौका यांना लक्ष्य करण्यात आले. इराणी माध्यमांनुसार सीरिक, केशम बेट आणि बंदर अब्बास येथे अनेक स्फोट झाले अन् काही ठिकाणी आग लागली
हॉर्मुझमध्ये इराणकडून तीन नौकांना लक्ष्य
खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची प्रक्रिया चालू असतांनाच इराणने हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये ३ नौकांना लक्ष्य केले. यांपैकी एक नौका कतारच होती. इराणने चेतावणी दिली की, त्याने निश्चित केलेल्या मार्गांचे पालन केले नाही, तर सुरक्षेची हमी दिली जाऊ शकत नाही.
इराणकडून नौकांवर केलेल्या आक्रमणांचा कतारकडून निषेध
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये स्वतःच्या नौकांवर केलेल्या आक्रमणांचा कतारने निषेध केला आणि यासाठी इराणला पूर्णपणे कायदेशीररीत्या उत्तरदायी धरले. इराणची ही आक्रमणे आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेसाठी धोका निर्माण करत असल्याचेही कतारने म्हटले आहे.
धमक्यांच्या वातावरणात अमेरिकेशी चर्चा नाही ! – इराण
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी स्पष्ट केले की, धमक्यांच्या वातावरणात कोणताही करार होऊ शकत नाही; अमेरिकेने आधी विद्यमान करारांचे पालन केले पाहिजे.
Bangladesh Temple Attack : बांगलादेशातील जुन्या श्री कालीमाता मंदिरावर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण
US Iran War : अमेरिकेचे इराणच्या चाबहार बंदरावर आक्रमण
PM Modi Australia Visit : ऑस्ट्रेलिया भारताला युरेनियम पुरवणार !
US Iran War : अमेरिकेच्या आक्रमणांना इराणचे जोरदार प्रत्युत्तर
डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर आक्रमण केल्याने संताप व्यक्त
Pakistan Plane Missing : पाकिस्तानचे मालवाहू विमान अचानक अरबी समुद्रावर झाले गायब !