अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना सेवेत घेऊ ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, ९ जुलै (वार्ता.) – अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील नियुक्त शिक्षकांची ८० टक्के पदे भरण्यास मान्यता दिली आहे. उर्वरित २० टक्के पदे वित्त विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर तातडीने भरण्यात येतील. ‘पोर्टल’वरील अडचणींचा आढावा घेऊ. त्यांना अतिरिक्त न ठरवता सेवेत कसे सामावून घेता येईल ?, याचा विचार करू. शिक्षक नियुक्तीच्या थकीत असलेल्या प्रस्तावांना एका महिन्यात मान्यता देण्यात येईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले. शिवसेनेचे सदस्य जगन्नाथ अभ्यंकर यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.