
पुणे – सद्य:स्थितीत जगभरात मोठी अशांतता पसरलेली आहे. अशा वेळी समाज आणि विश्व यांच्या कल्याणासाठी प्रार्थनेची नितांत आवश्यकता आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी ‘पसायदाना’च्या माध्यमातून संपूर्ण विश्वासाठी ईश्वराकडे मागणे मागितले आहे. आषाढी वारीनिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे पुण्यात संतांच्या पालख्यांचे आगमन होत आहे. या मंगलमयी वातावरणात विश्वशांती आणि विश्वकल्याण यांसाठी १० जुलैला रात्री ९ वाजता सर्व पुणेकर आणि भाविक यांनी एकत्र मिळून ‘पसायदान पठण’ करावे, असे आवाहन पुण्याच्या महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी केले आहे. या वर्षीच्या वारी सोहळ्याला त्यांनी ‘सेवा वारी’ असे नाव दिले आहे.
सामुदायिक प्रार्थनेतून निर्माण होणार आध्यात्मिक ऊर्जा !
जेव्हा लाखो भक्त एकाच वेळी, एकाच स्वरात पसायदान म्हणतील, तेव्हा त्यातून निर्माण होणारी ऊर्जा आणि लहरी विश्वशांतीसाठी अत्यंत प्रभावी ठरतील, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे.
सहभागासाठी आवाहन
हा अनुभव घेण्यासाठी सर्वांनी या उपक्रमात सहभागी होणे आवश्यक आहे. जे नागरिक पालखी मुक्काम स्थळी उपस्थित राहू शकतात, त्यांनी तिथे वारकर्यांसोबत मिळून पठण करावे. जे नागरिक मुक्काम स्थळी येऊ शकत नाहीत, त्यांनी आपल्या घरातून किंवा जिथे असतील तेथून ऑनलाईन माध्यमातून या उपक्रमात सहभागी व्हावे. यासाठी सामाजिक माध्यमावर उपलब्ध असलेला ‘क्यू आर कोड’ आणि संकेतस्थळाचा वापर करावा.
हा उपक्रम कोणत्याही प्रसिद्धीसाठी किंवा श्रेयासाठी नसून, पुण्यातील सेवा करण्याची संस्कृती जपत विश्वशांतीसाठी केलेली एक शुद्ध प्रार्थना आहे, असेही सौ. मंजुषा नागपुरे यांनी शेवटी नमूद केले.
मोशी दुर्घटनेत अग्नीशमनदलाच्या कर्मचार्यांनी ९ जणांना वाचवले !
अटक केलेल्या भाऊसाहेब चव्हाण अधिकार्याला बडतर्फ करू !
अधिक मोबदल्याच्या हेतूने ‘रिंगरोड’साठी भूमी खरेदी झाल्याविषयी चौकशी होणार !
अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना सेवेत घेऊ ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ‘मिरर’ स्वरूपात छापले; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन !
जंजिरा गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याच्या मागणीसाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे मुंबईत तीव्र आंदोलन !