Bangladesh Temple Attack : बांगलादेशातील जुन्या श्री कालीमाता मंदिरावर धर्मांध मुसलमानांचे आक्रमण

  • मंदिर आणि मूर्ती यांची तोडफोड

  • मुख्य आरोपीला स्थानिक हिंदूंनी पकडले  

ढाका (बांगलादेश) – देशातील पंचगढ जिल्ह्यातील अतवारी उपजिल्ह्यात ऐतिहासिक श्री कालीमाता मंदिराला काही धर्मांध मुसलमानांनी लक्ष्य केले. त्यांनी मंदिराच्या वास्तूची तोडफोड केली आणि मंदिरातील पवित्र श्री कालीमातेच्या मूर्तीची अत्यंत अमानुषपणे विटंबना केली. या घटनेमुळे स्थानिक हिंदु समुदायात तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण पसरले आहे.

मुख्य आरोपीला स्थानिक नागरिकांनी रंगेहात पकडले

या प्रकरणातील मुख्य आरोपीची ओळख झाकेर इस्लाम अशी झाली आहे. आक्रमणानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असतांना स्थानिक हिंदूंनी अत्यंत तत्परता दाखवत त्याला रंगेहात पकडले. अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणजे, जेव्हा स्थानिकांनी त्याला पकडले, तेव्हा विटंबना केलेल्या श्री कालीमातेच्या मूर्तीचे शीर त्याच्या हातात होते.

या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर स्थानिक रहिवाशाने म्हटले की, आमचे हे जुने श्री कालीमाता मंदिर आणि येथील वास्तू बळकावण्याच्या उद्देशाने पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. जर भरदिवसा सर्वांसमक्ष असे प्रकार घडत असतील, तर आम्ही हिंदूंनी न्याय मागण्यासाठी कुठे जायचे ? आम्ही आमचे सण, आमचे प्राण आणि आमच्या धर्माचे रक्षण कसे करायचे ?

स्थानिक प्रशासन आणि पोलीस दल यांनी या प्रकरणात तात्काळ हस्तक्षेप करून मंदिराच्या भूमीला कायमस्वरूपी संरक्षण द्यावे आणि पकडण्यात आलेल्या झाकेर इस्लामसह या कटात सहभागी असलेल्या सर्व गुन्हेगारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

संपादकीय भूमिका

भारतासह जगातील निष्क्रीय आणि निद्रिस्त हिंदूंना अन् त्यांच्या संघटनांना आता बांगलादेशातील अशा घटनांविषयी काहीच वाटत नसल्याने त्या थांबणार नाहीत. काही वर्षांत बांगलादेशातील हिंदूंचे अस्तित्व नष्ट होणार, हेही तितकेच सत्य आहे !