
रामनाथी (गोवा) – कोल्हापूर येथील डॉ. अश्विनी माळकर आणि श्रीमती शीलाताई माने यांनी ५ जुलै या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट दिली. डॉ. अश्विनी माळकर कोल्हापूरमध्ये रा.स्व. संघाशी निगडित ‘हिंदु जागरण’चे दायित्व सांभाळत आहेत. श्रीमती शीलाताई माने या कोल्हापूर येथील हिंदु महासभा महिला आघाडी या संघटनेत कार्य करतात. डॉ. माळकर आणि श्रीमती माने यांना सनातनचे साधक श्री. अमोल हंबर्डे यांनी आश्रमात चालू असलेल्या राष्ट्र आणि धर्म, तसेच आध्यात्मिक संशोधन यांविषयीच्या कार्याची ओळख करून दिली.
या वेळी अभिप्राय व्यक्त करतांना डॉ. अश्विनी माळकर म्हणाल्या, ‘‘आश्रमात सर्वत्र प.पू. डॉ. आठवले गुरुजींची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) सूक्ष्मातून उपस्थिती जाणवते. आश्रमात परमानंदाची प्रचीती आली. येथे प्रचार-प्रसारयोग्य माहिती मिळाली.’’
श्रीमती शीलाताई माने म्हणाल्या, ‘‘आश्रमात सगळ्या सकारात्मक गोष्टी आढळल्या आणि सात्त्विक ऊर्जा मिळाली. आश्रम पाहून पुष्कळ छान वाटले.’’
‘गोकुळ’च्या अपकीर्तीच्या विरोधात डॉ. युवराज येडुरे यांचे भर पावसात आत्मक्लेष आंदोलन !
धार्मिकदृष्ट्या जागरूक हिंदूच हिंदु राष्ट्रासाठी प्रभावीपणे कार्य करू शकतात ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
युवती आणि महिला यांच्या सुरक्षेसाठी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ तात्काळ लागू करावा !
‘महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगा’चे अध्यक्ष पाशा पटेल ‘ॲग्रीकल्चर लीडरशिप अवॉर्ड’ने सन्मानित !
गोहत्या करणार्यांची शिक्षा आणि दंड यांत वाढ करा ! – सुधीर मुनगंटीवार, आमदार, भाजप
Chhattisgarh High Court : शाळांमध्ये गायत्री मंत्राचे पठण करण्याचे निर्देश देणार्या परिपत्रकाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली !