दोषींवर कठोर कारवाईची मागणी

ठाणे, ८ जुलै (वार्ता.) – डोंबिवली येथील महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्य बजावत असलेल्या आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांवर झालेल्या आक्रमणाच्या घटनेने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. एका रुग्णाच्या उपचारावरून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर कोपर भागाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आणि त्यांचे समर्थक यांच्याकडून आधुनिक वैद्यांना धक्काबुक्की अन् मारहाण करण्यात आली होती. याचे चित्रीकरण मोठ्या प्रमाणात सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि आधुनिक वैद्य यांनी तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपींवर कोणताही राजकीय हस्तक्षेप न होता कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी डॉक्टर संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक यांच्याकडून जोर धरत आहे.
या प्रकरणी गुन्हा नोंद करत अक्षय करंडे, रमेश पवार आणि प्रमोद निकम या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ५ आरोपींमध्ये एका महिला आरोपी आहे, तर नगरसेवक रमेश म्हात्रे यांनाही अटक करण्याची प्रक्रिया आम्ही चालू असल्याचे समजते.
Karnavati Blasts 2008 : ३८ जिहादी आतंकवाद्यांची फाशी अन् ११ जणांची जन्मठेप गुजरात उच्च न्यायालयाने ठेवली कायम !
सीरियाची राजधानी दमास्कस जेथे फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थांबले होते, त्या भागात लागोपाठ ४ बाँबस्फोट : ३ जणांचा मृत्यू
ओमानच्या समुद्रात एका नौकेवर क्षेपणास्त्राद्वारे आक्रमण : इराणवर संशय
Balochistan : बलुचिस्तानमध्ये पोलीस चौकीवरील आक्रमणात ९ पोलीस ठार, तर ५ जण बेपत्ता
Baloch Liberation Army Attack : बलुचिस्तान प्रांतात ‘बलुच लिबरेशन आर्मी’ कडून आत्मघाती आक्रमणात पाकिस्तानचे ३० सैनिक ठार !
कामगार विमा रुग्णालयांत आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी शासनाचे प्रयत्न ! – प्रकाश आबिटकर, आरोग्यमंत्री