
कोल्हापूर – जिल्ह्यातील शेतकरी परिवाराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मोलाचे योगदान देत असलेल्या ‘गोकुळ’ दूधसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चालू असलेली अपकीर्ती त्वरित थांबवावी, यांसाठी सामाजिक कार्यकर्ते डॉ. युवराज येडुरे यांनी भर पावसात गोकुळ शिरगाव येथे आत्मक्लेष आंदोलन केले. या आंदोलनासाठी शेतकरी, कष्टकरी आणि महिला यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.स्वत:च्या आंदोलनाविषयी भूमिका स्पष्ट करतांना डॉ. युवराज येडुरे म्हणाले, ‘‘माझ्यासारख्या असंख्य सामान्य शेतकरी कुटुंबांना ‘गोकुळ’ने आधार दिला आहे. प्रत्येक १० दिवसांनी मिळणार्या दुधाच्या देयकावर लाखो कुटुंबांचे घर चालले, मुलांचे शिक्षण झाले आणि अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली. त्यामुळे ‘गोकुळ’ दूधसंघ आमच्यासाठी भावना, विश्वास आणि अस्मिता आहे. अलीकडच्या काळात गोकुळ दूध संघाभोवती चालू असलेले आरोप-प्रत्यारोप, राजकीय संघर्ष, अपकीर्तीची मोहीम आणि स्वार्थी राजकारण यामुळे संघाची प्रतिमा मलिन होत आहे. ती होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे.’’
आंदोलनानंतर ‘गोकुळ’च्या कार्यालयात निवेदन देण्यात आले. आगामी १५ दिवसांत स्वत:च्या मागण्यांवर सकारात्मक कारवाई न झाल्यास पुढील आंदोलनाची दिशा घोषित करू, असेही डॉ. युवराज येडुरे यांनी सांगितले.
मोशी दुर्घटनेत अग्नीशमनदलाच्या कर्मचार्यांनी ९ जणांना वाचवले !
अटक केलेल्या भाऊसाहेब चव्हाण अधिकार्याला बडतर्फ करू !
अधिक मोबदल्याच्या हेतूने ‘रिंगरोड’साठी भूमी खरेदी झाल्याविषयी चौकशी होणार !
अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांना सेवेत घेऊ ! – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
‘लोकराज्य’ मासिकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र ‘मिरर’ स्वरूपात छापले; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आश्वासन !
जंजिरा गडावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवण्याच्या मागणीसाठी ‘सह्याद्री प्रतिष्ठान’चे मुंबईत तीव्र आंदोलन !