धार्मिकदृष्ट्या जागरूक हिंदूच हिंदु राष्ट्रासाठी प्रभावीपणे कार्य करू शकतात ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती

बैठकीला उपस्थित हिंदुत्वनिष्ठ

उत्तर २४ परगणा (बंगाल) – ‘हिंदु राष्ट्र समन्वय समिती, बंगाल’च्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे बंगाल संयोजक श्री. अनिर्बान नियोगी यांनी समन्वय समितीचा उद्देश सांगितला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि ईशान्य भारताचे राज्य समन्वयक श्री. शंभू गवारे म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य करण्यासाठी धर्माचे ज्ञान आवश्यक आहे. त्यामुळे हिंदु संघटनाचे काम करतांना प्रत्येकाने धर्माची मूलतत्त्वे समजून कार्य करणे आवश्यक आहे.’’ या बैठकीचे आयोजन हिंदुत्वनिष्ठ श्री. मनोजकुमार मंडल आणि श्री. शामल मुखर्जी यांनी केले होते.